महावितरण कंपनी विरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची ठिणगी आज अवसरी गावातून पेटणार?

इंदापूर: महावितरण कंपनीने इंदापूर तालुक्यामध्ये सर्व शेतीपंपाचे विद्युत पुरवठा खंडित केला आहे.त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये पूर्णता नाराजी आहे.शेतकऱ्यांच्या भावना हि खूप तीव्र होत चाललेल्या आहेत त्या निमित्तानेच आज इंदापूर तालुक्यातील अवसरी या गावांमध्ये शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हनुमंत वीर, पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग रायते, इंदापूर तालुका अध्यक्ष गुलाबराव फलफले हे उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महावितरण विरोधात शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन पेटणार आहे असेच चित्र निर्माण झाले आहे. जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग रायते म्हणाले की,”आज संध्याकाळी ठीक ५.३० वाजता अवसरीमध्ये महावितरण विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आम्ही येत आहोत सर्व शेतकऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय पर्यायच राहिलेला नसून सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी वर्गांनी आपला वेळ काढून आवर्जून अवसरीमध्ये ठीक साडेपाच वाजता उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
एकूणच महावितरण कंपनी विरोधात शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाले असून सत्ताधारी व विरोधक गप्पच बसले असल्याने शेतकरी संघटना करत असलेल्या बैठकीस आता विशेष महत्त्व आले आहे.

 

 

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here