छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी बद्दल सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी दिले तहसीलदार यांना निवेदन.

इंदापूर: नुकतेच इंदापूरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना एक निवेदन दिलेले आहे या निवेदनात असे म्हटले आहे की,”दिनांक २७/०२/२०२२ रोजी औरंगाबाद या ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी जर समर्थ रामदास नसते तर शिवाजीला कोणी विचारले नसते असे म्हणाले होते वास्तविक पाहता सर्व इतिहास संशोधकांनी रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे पुराव्यानिशी सिद्ध केलेले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद खंडपीठाने रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते अशा पद्धतीचा निकाल एका प्रकरणामध्ये दिलेला आहे. तरीदेखील एका जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने न्यायालयाचा अवमान केलेला आहे. त्यामुळे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी.अन्यथा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्र भर तीव्र पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल.” अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेले आहे .या निवेदनामध्ये हनुमंत कांबळे ( वंचित आघाडी ) शिवाजीराव मखरे (आर पी आय) संदिपानजी कडवळे, बापूसाहेब जामदार ( भाजपा ) प्रकाश पवार ( अध्यक्ष . मौर्य क्रांती संघ ) नानासाहेब चव्हाण (बहुजन मुक्ती मोर्चा ) संतोष क्षीरसागर ( B M P ) प्रतिक झोळ ( कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ ) विजय इंगुले ( खाटीक संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष ) महादेव लोंढे ( काँग्रेस ) आप्पासाहेब माने , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आतार,माऊली नाचण,वसीम भाई ( कार्याध्यक्ष NCP ) अमोलजी मिसाळ,स्वप्निल देशमाने . नितीन देशमाने या विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी निवेदनात सह्या करून सदरचे निवेदन तहसीलदार यांना सादर केले आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडामोडी घडतील हे येणाऱ्या काळातच समजेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here