प्रतिनिधी: सविता आंधळकर
करमाळा: येणाऱ्या परीक्षेच्या कालावधी साठी म्हणजेच एमपिएससी, एसएससी, एचएससी साठी विशेष बस सोडण्यात येतील. याविषयी सविस्तर माहिती अशी की, .गेल्या काही दिवसांमध्ये बस चा संप असल्याने विद्यार्थी तसेच नागरीकांचे प्रवासाच्या बाबतीत बरेच हाल होत अल्याचे दिसुन येते. त्यामुळे येत्या 26 फेब्रवारी पासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थांचा मार्ग सोईस्कर व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या करमाळा बसस्थानकावरून बस सोडण्यात येणार असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी देखील विद्यार्थांना बस उपलब्ध असतील. विद्यार्थांच्या मागणीनुसार सकाळी 6 आणि दुपारी 12.30 ला बस करमाळा-टेंभुर्णी- सोलापूर मार्गांवरून सोडण्यात येतील. तरी ज्या विद्यार्थांना परीक्षेसाठी जायचे आहे त्यांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा आगार व्यवस्थापक आश्वीनी किरगत यांनी केले असून विद्यार्थांनी कोव्हीड प्रिकॉशन घेऊनच बस मध्ये यावे असेही सांगितले. सध्याच्या या संपाच्या कालावधी मध्ये विद्यार्थांसाठी बस चालू करणे ही निश्चीतपणे कौतुकास्पद बाब आहे.