संत गाडगे बाबांच्या रुपात महाराष्ट्राला खरे समाजसेवक व स्वच्छतेचे जनक लाभले, महाराष्ट्र त्यांना कधीही विसरणार नाही – शिवसेना तालुका प्रमुख नितीन शिंदे

इंदापुर – : आज इंदापूर येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज यांची 146 वी जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा महाराज चौकात संत गाडगेबाबा यांना विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे म्हणाले की, राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या जीवनाचे एकमेव ध्येय हे लोकसेवा होते. त्यांनी गरीब आणि कष्टकरी आणि उपेक्षितांची सेवा ही फक्त देवाची भक्ती मानली. त्यांनी धार्मिक आडमुठेपणाला तीव्र विरोध केला. त्यांचा असा विश्वास होता की देव ना तीर्थस्थळांमध्ये आहे, ना मंदिरांमध्ये, ना मूर्तींमध्ये. देव समाजात दरीद्र नारायणच्या रूपात अस्तित्वात आहे. मनुष्याने या देवाला ओळखले पाहिजे आणि शरीर, मन आणि संपत्तीने त्याची सेवा केली पाहिजे. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, नग्नांना कपडे, निरक्षरांना शिक्षण, निरुपयोगींना काम, निराधारांना सांत्वन आणि मूक प्राण्यांना निर्भयता ही देवाची खरी सेवा आहे. हा संदेश संत गाडगेबाबा यांच्यामुळेच समाजाला मिळाला असे नितीन शिंदे म्हणाले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी,राष्ट्रवादीचे शशिकांत तरंगे, इंदापूर चे विद्यमान नगरसेवक अनिकेत वाघ ,भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष नितीन दादा जगताप,युवानेते अनिल अण्णा पवार,युवराज मस्के,इंदापूर परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत घोडके संस्थापक अध्यक्ष सोपान कारंडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चे गणेश घाडगे,हर्षवर्धन कांबळे,अरुण कारंडे,महेश वाघमारे,नाना पाटोळे, नवनाथ भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here