शेटफळ हवेलीचा चिमुकला शब्बीरसाठी राज्यमंत्री भरणेमामा बनले देवदूत.

इंदापूर: शेटफळ हवेली गावातील समशेर पठाण यांचा नातू शब्बीर मोहम्मद पठाण वय वर्षे पाच त्याला हृदयाचा त्रास होता त्याला ऑपरेशन केल्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे छोटे शेतकरी कुटुंब असल्यामुळे सात ते आठ लाख रुपये खर्च करणे शक्य नव्हते इंदापूरला भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित हृदयरोग शिबीर मागील दोन महिन्यापूर्वी भरले होते त्यामध्ये मोफत तपासणी केली असता त्याच्यावर उपचार होऊ शकतात असे डॉक्‍टरांनी सुचवले व त्यानुसार शेतफळ हवेली गावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते व समशेर पठाण यांनी भरणे मामांकडे पाठपुरावा केला.
मामांनी शिफारस केल्यामुळे सरकारी योजनेमधून साडेआठ लाख रुपयेची मदत या खर्चासाठी झाली तसेच संपूर्ण मोफत ऑपरेशन यशस्वी पार पडले.सध्या या चिमुकल्याची तब्बेत ठीक असून त्याला जणू नवजीवन मिळाले आहे.म्हणून गावातील कार्यकर्त्यांसह समशेर पठाण यांनी मामांचा सत्कार केला व आभार मानले असेच गरिबांच्या पाठीशी उभी राहावा ही विनंती त्यांनी केली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here