माता रमाई यांची 124 वी जयंती इंदापूर येथे थाटात साजरी.

उपसंपादक- अवधूत पाटील इंदापूर
इंदापूर:नऊ कोटीची आई माता रमाई यांची 124 वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाउसिंग सोसायटी मध्ये मोठ्या थाटात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन व त्रिसरण पंचशील आयुष्यमान डॉ. शहाजी मिसाळ, डॉ. जीवन सरवदे,प्राध्यापक श्रीनिवास शिंदे,विलास दादा मखरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुधीर शेठ मखरे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षपद आयु. डॉ. शहाजी मिसाळ यांनी भूषविले प्रास्ताविक प्रा. श्रीनिवास शिंदे सरांनी रमाई त्यागमुर्ती कशी व रमाईचा जीवन पट याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर डॉ अभिनंदन सरवदे यांनी माता रमाई यांच्या वर एक कविता सादर केली व जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
विलास दादांनी आपले मनोगत व्यक्त केले व माता रमाई चा जीवन संघर्ष मांडला माता डॉ. जीवन सरवदे यांच्या हस्ते धम्मयान या वाटप करण्यात आले याप्रसंगी उपस्थित डॉ.संजय चव्हाण, सुरेश आबा मखरे, सतीश मखरे, रवींद्र चव्हाण, सर्जेराव मखरे, सिद्धार्थ मखरे,विनोद ननावरे,अंकुश मामा भोसले, हनुमंत चव्हाण, अशोक वाघमारे, अनिल मखरे ,उमेश मखरे, योगेश मखरे,महिलांमध्ये अलकाताई मखरे,वर्षाताई मखरे, हेमाताई मखरे, सुलभाताई मखरे,अश्विनीताई मखरे, सुवर्णाताई मखरे, श्वेताताई मखरे, वृशाली ननावरे,आशाताई मखरे,निता चव्हाण,महानंदाताई चव्हाण, प्रतिभाताई मखरे,स्नेहल मखरे,कोमल कांबळे, शोभाताई कांबळे,द्रोपदी मखरे,भिकुबाई मखरे, अनुसया मखरे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी आयु. सतीश मखरे आणि त्यांच्या परिवारा मार्फत जिलेबी चे वाटप करून कार्यक्रमाचा शेवट गोड करण्यात आला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here