न केलेल्या कामाचे श्रेय राष्ट्रवादीने घेऊ नये : साहेबराव पिसाळ

इंदापूर: गेल्या काही दिवसांपासून इंदापुर तालुक्यात श्रेयावादाची लढाई चालू असतानाच भाजपा सोशल मीडिया अध्यक्ष साहेबराव पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर जोरदार टीकास्त्र केले आहे. साहेबराव पिसाळ म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसने इंदापुरमध्ये एक वेगळाच पॅटर्न सुरू केला आहे.ज्या विकासकामांचा व त्यांचा संबंध नाही ते काम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आम्हीच केले असा गवगवा ते करत आहेत. इंदापूर तालुक्याच्या विविध भागांमध्ये केंद्रात असलेल्या भाजप सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर माध्यमातून कोट्यवधींची विकासकामे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.या कामांचा फायदा सर्वसामान्य जनतेला होत आहे.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सर्वसामान्य जनतेसाठी विकास कामे करायची सोडून आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेली कामे आम्ही केलेत,राज्यमंत्री यांनी केलेत हा गवगवा करण्यात व्यस्त आहे अशी टीका इंदापूर तालुका भाजपा सोशल मीडिया चे अध्यक्ष साहेबराव पिसाळ यांनी केली.
पुढे ते म्हणाले,येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतःचे अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी केविलवाना प्रकार करत आहेत, अशी ही टिका साहेबराव पिसाळ यांनी प्रसंगी केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here