– आदर्श राजकीय संस्कृतीचे दर्शन
– राजकारणा पलीकडे जपली मैत्री!
इंदापूर : प्रतिनिधी दि. 6/2/2022
राजकारण हे तत्वनिष्ठ हवे, पक्ष वेगवेगळे असले तरी मैत्री जपली पाहिजे असे म्हटले जाते. इंदापूर तालुक्यामध्ये याचा प्रत्यय सोमवारी ( दि. 7) दिसून आला. भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मोहोळचे राष्ट्रवादीचे आ.यशवंत माने यांनी अचानकपणे भेटताच रस्तावरच थांबून गप्पागोष्टी करीत राजकीय संस्कृतीचा आदर्श दाखवून दिला.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील राज्यात सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. ते सुमारे 19 वर्षे मंत्री होते व राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांची त्यांचे राजकारणापलीकडे सलोख्याचे संबंध आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात उत्कृष्ट संसदीय कार्य मंत्री म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. सोमवारी ते इंदापूर मतदार संघात सकाळपासून दौऱ्यावरती होते. गोतंडी हुन ते दुपारी शेळगाव परिसराकडे निघाले होते. त्याच वेळी शेळगाव हुन आ. यशवंत माने हे आपल्या मोहोळ मतदारसंघाकडे निघाले होते. आ.माने हेही सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात. शेळगाव नजीक आ. माने यांनी माजी मंत्री पाटील यांची गाडी पाहताच आपली गाडी थांबवली….. रस्त्यावरती थांबून या दोन नेत्यांनी हास्यविनोदात गप्पागोष्टी केल्या. यावेळी आ. माने यांचे स्वीय सहाय्यक व पत्रकार संतोष ननवरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता या दोन नेत्यांना कॅमेऱ्यात कैद केले. या आपुलकीच्या भेटीनंतर दोन्ही नेते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.