दौड : दौंड तालुक्यातील पाटसला सुसज्ज आरोग्य केंद्र आणि खानवटे येथे आरोग्य उपकेंद्रास लवकरच मंजुरी दिली जाईल, दौंडला आरोग्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.दौंडचे माजी आमदार रमेश थोरात आणि शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची ‘व्हीआयपी सर्किट हाऊस पुणे ‘ येथे भेट घेतली. गुरुवार ( दि.३)यावेळी रमेश थोरात यांनी आरोग्य मंत्री टोपे यांच्याशी तालुक्यातील आरोग्याच्या संदर्भातील विविध विषयावर चर्चा केली. तालुक्यातील पाटस येथे सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच खानवटे येथे आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केलेले असून त्यास तात्काळ मंजूरी द्यावी, अशी मागणी थोरात व पवार यांनी मंत्री राजेश टोपे यांना केलेली आहे.
Home Uncategorized दौंड तालुका व शिरूर तालुक्याला आरोग्यासाठी भरीव निधी देणार आरोग्य मंत्री राजेश...