इंदापूर:जिल्हा परिषद फंडातून विविध विकास कामांचे भूमिपूजन अंकिता ताई पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य भारती दुधाळ यांनी जिल्हा परिषद माध्यमातून आलेल्या कामांची माहिती दिली. यामध्ये
१)जिल्हा परिषद केंद्र शाळा संरक्षण भिंत बांधणे १० लाख रुपये,
२)लक्ष्मी आई मंदिर सभा मंडप बांधणे ४ लाख रुपये.
३)जय भवानी मंदिर सभामंडप पवार वस्ती ३ लाख रुपये.
४) व्याहळी ते थोरातवाडी रस्ता करणे ५ लाख रुपये.
५) व्याहळी गावातील नवीन स्मशानभूमी शेड बांधणे ५ लाख 60 हजार रुपये. या कामांचा समावेश आहे.
यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव ,भाजपा विस्तारक राजकुमार जठार ,मोहन दुधाळ,सरपंच दादासो पाटोळे, उपसरपंच पुनम संतोष पवार, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल जाधव ,ग्रामपंचायत सदस्या निर्मला मोरे ,साक्षी शिंदे, सतीश शिरसाठ, सुनिल पवार ,तानाजी सूर्यवंशी ,सुरेश पवार ,वाल्मिक शिंदे ,गोळेसर ,महेंद्र मोरे, ग्रामसेवक मारकङ बी.एल., तसेच वेळी गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.