इंदापूर : सावता परिषदेचा१५ वा वर्धापन दिन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना भरणे यांनी सांगितले की सावता परिषदेला नेहमीच पाठबळ असते आणि ते कायम राहणार आहे. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी या सावता परिषदेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून त्यांचे कार्य नेहमीच कौतुकास्पद असते. या वेळी यशवंत माने यांनीही सावता परिषदेच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू , सावता परिषद इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे, सावता परिषदेचे युवक आघाडी तालुकाध्यक्ष अमर बोराटे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननवरे, तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, तालुका कार्याध्यक्ष मच्छिंद्र भोंग,इंदापूर सोशल मीडिया प्रमुख सचिन शिंदे, सावता परिषदेचे युवानेते अजय गवळी, तालुका संघटक सुहास बोराटे , पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन सपकळ ,शिंगाडे वकील ,राष्ट्रवादीचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर , सणसर ग्रामपंचायत सरपंच व छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, तालुक्याचे खरेदी-विक्री संघाचे संचालक कोंडीबा भोंग, विकास सोसायटीचे संचालक महादेव शेंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.