युवकांचे आयकॉन राजवर्धन दादा सामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व,पाटील घराण्यामध्ये आजोबा-पणजोबा पासून दीनदुबळ्यांची सेवा करण्याची वृत्ती. मनामध्ये कसलाही हेतू आशा-आकांक्षा न ठेवता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा युवक नेता म्हणून आज राजवर्धन दादांच्या कडे पाहिले जाते. लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होवून सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी सदैव सज्ज असतात. खरंतर हे बाळकडू आमचे दैवत नामदार हर्षवर्धनजी पाटील साहेब आणि वहिनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेले आहे .इतिहास सांगायचा झाला तर राजवर्धनदादांचे पंजोबा कै. बाजीराव पाटील उर्फ आबा तसेच दादांचे आजोबा शहाजीराव पाटील उर्फ बापू आणि इंदापूर तालुक्याचे आराध्यदैवत स्व.शंकररावजी पाटील यांच्या कर्तुत्वाच्या संस्कारातून या युवक नेत्याची जडणघडण झालेली आहे .सद्गुणांचा वारसा, जिव्हाळा, प्रेम ,आपुलकी, जनसामान्यांना आपलंसं करणारं नेतृत्व, युवकांचे आशास्थान म्हणून दादांसारखे एक नेतृत्व उदयाला आल. संपूर्ण तालुका, जिल्ह्यामध्ये त्यांचे काम पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर निरा भिमा सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या संचालक पदी निवड झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना , कामगारांना जेवढा म्हणून न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे एक तरुण वर्ग त्याच्यांकडे आशेने पाहत आहे .सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या कुटुंबाबरोबर स्नेहाच नात जुळवुन त्यांच्या सुख दुःखा मध्ये सहभागी होऊन त्यांना सर्व तो परीने सहकार्य करणे हे दादांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. वास्तविक पाहता वरिष्ठ पातळीवर ती काम करत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे परंतु कामाची चिकाटी हे दादांचे खरे वैशिष्ट्य आहे. या कालावधीमध्ये युवक संपन्न नेतृत्व ,सर्वसामान्य सामावेशक सामाजिक नेतृत्व हे उदयाला येताना पाहतोय आज १ फेब्रुवारी राजवर्धनदादांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त दादा गुणवंत, भाग्यवंत, नितीवंत, धनवंत ,यशवंत, किर्तीवंत आणि या पृथ्वीतलावर ते असणारे सर्व यश, ऐश्वर्य आपल्याला मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
लेखन: दशरथ घोगरे,प्राचार्य
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा.