करमाळा: जनतेच्या कामाविषयी असणारी धडपड व गोरगरिबांच्या साठी असणारी तळमळ, धडाडीने काम करण्याची इच्छा, महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसाठी केलेले आंदोलन, संजय गांधी, रक्तदान शिबीर,योजना श्रावणबाळ योजना असो किंवा निराधार योजना असो यासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पाठपुरावा करून काम कर करण्याची उमेद पाहून जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी करमाळा महिला तालुकाध्यक्षपदी दिपाली डिरे यांची निवड केली आहे.डीरे यांनी बॅंक अधिकाऱ्यांच्या लबाड आणि भोंगळ कारभाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी तहसील कार्यालयात आंदोलन करून एका निराधार व विधवा महीलेला न्याय मिळवून दिला. दारूबंदीसाठी आंदोलन, सत्ताधाऱ्यांनी पळविलेले शेतकऱ्यांच्या हक्काचे उजनीचे पाणी थांबविण्यासाठी केलेले अंत्ययात्रा आंदोलन आणि त्याला मिळालेले यश या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांना संघटना वाढीसाठी पद दिल्याची माहिती अतुल खुपसे पाटील यांनी दिली. यावेळी उपस्थित दत्ता कोकणे अतुल राऊत हनुमंत कानतोडे आबा येडे बाळासाहेब कणीचे चिवल्या कणीचे बाळासाहेब कणिचे , दत्ता त्रेय चबरे , प्रविण कणिचे , दादासाहेब पतुले महादेव कणिचे ,कोमल खाटमोडे, सोमनाथ खाटमोडे, विजय कणिचे इत्यादी उपस्थित होते.