निमगाव केतकी: संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग 965 जी
निमगाव केतकी पालखी मार्ग चालू रस्त्यावरून करावा असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे. चालू रस्ता हा 100 फुटाचा आहे निमगाव केतकीच्या पश्चिम दक्षिण बाजूने चालू रस्त्याचे अजून एक जुना रस्ता आहे पालखी महामार्ग साठी लागणारी जागा आम्ही देण्यास तयार आहोत असे काही व्यापाऱ्यांचे मत आहे.
निमगाव केतकी च्या बाहेरून रस्ता गेल्यास आमचे नुकसान होईल आमचे प्रपंच उघड्यावरती येतील उपासमारीची वेळ आमच्यावर येईल असे काही व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे.
निमगाव केतकी येथील पालखी महामार्ग हा गावातून चालू रस्त्यावरून करण्यात यावा यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या काही व्यापाऱ्यांनी आपल्या लेखी सह्या दिले आहे. यामध्ये
बापू महादेव भोंग, दादासाहेब आर्जुन भोंग, तात्यासाहेब एकनाथ भोंग, शकुंतला अंकुश म्हेत्रे, गणपत शंकर भोंग, निवृत्ती शिवराम हेगडे, गणेश बाबुराव जगताप, उषा संजय पवार ,अनिल नागनाथ राजगुरू, दशरथ शिवा बनकर, हनुमंत कुंडलिक पवार,अनिल शेंडे, राहुल भोंग, अशोक एकनाथ हेगडे, सुनील आण्णा आदलिंग, तब्बल 67 व्यापारी वर्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.