“आमचं सरकार असताना देखील काम होईनात ही शोकांतिका”- राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी यांचं आणखी एक तोफ

सामान्य प्रशासन विभागाकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत टीकास्त्र…
इंदापूर : इंदापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते गजानन गवळी हे कालपासून राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ करीत असल्याचे दिसून येत आहे, गवळी यांनी केलेल्या तक्रारीमुळे, वक्तव्यामुळे इंदापूर शहर व तालुक्यात एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे.काल सार्वजनिक बांधकाम खात्यावर तर आज सामान्य प्रशासन विभागाच्या दिरंगाई च्या कारभारावर बोट ठेवत खुद्द राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खात्याच्या कामावर दिरंगाई होत असल्याचे वक्तव्य गवळी यांनी केलं आहे.
इंदापूर नगरपरिषदेत नियमित कामावर असताना मृत्यू झालेल्या वारसांना तसेच काही त्रुटींमुळे नियमित नसणाऱ्या ६६ कर्मचाऱ्यांची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे दाखल होऊन दोन महिने झाले तरीही सही होत नाही ही शोकांतिका आहे असे वक्तव्य इंदापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन गवळी यांनी केलं आहे.पुढे गवळी म्हणाले की,इंदापूर नगरपरिषदेत अनुकंपा तत्वावर कामावर घेण्यासाठी जे वारस मागणी करत होते.ते अनुकंपासाठी पात्र आहेत अस पत्र दिनांक ३० डिसेंबर रोजीच्या २१२४ नंबरच्या आवक-जावक नुसार नगरपरिषदेमार्फत सहआयुक्त नगरपरिषद प्रशासन यांना दिले त्याची पूर्तता करून आज ते सामान्य प्रशासन विभाग आयुक्त व सहआयुक्त पुणे यांच्याकडे आहे.परंतु या खात्याचे श्री.खोसे यांच्याकडून कर्मचारी नियमित बसत असताना सुद्धा दिरंगाई होत आहे.
एवढ्या छोटछोट्या गोष्टींसाठी राज्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तरी देखील काम होत नाहीत. आज त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.ते आंदोलन,उपोषण करताना त्यांच्या तब्येतीही बिघडल्या होत्या.या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कामं झालं पाहिजे होत पण झाल नाही याची खदखद वाटते.
पुढे बोलताना गवळी म्हणाले की,माझे वडील देखील इंदापूर नगरपरिषदेत शिपाई होते.त्या काळातील ६६ कर्मचारी काही त्रुटींमुळे नियमित नसून त्यांचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर करून त्यांच्या शिफारशीनुसार नगरपरिषद संचालनालयाने अहवाल मागविला होता.तो अहवाल सकारात्मक करून व सर्व गोष्टींची पूर्तता करून सामान्य प्रशासन विभागाकडे दिला आहे.परंतु दोन महिने उलटून देखील त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.सामान्य प्रशासन खाते आपल्या राज्यमंत्र्यांकडे आहे तरी देखील सामान्य विभागाकडून या फाईलवर सही होत नसेल तर हे भयानक आहे.या कर्मचाऱ्यांना ६ वा,७ वा वेतन आयोग मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अतोनात कामं केलं आहे.राज्यात आपलं सरकार नाही म्हणून काम होत नाही असं कर्मचाऱ्यांना त्यावेळी सांगत होतो.परंतु आत्ता आपलं सरकार असून देखील काम होत नसेल तर ही दुर्दैवी बाब आहे अस गटनेते गजानन गवळी म्हणाले.
आम्ही वारंवार पाठपुरावा केला आहे.तरी आमची हेळसांड होत असेल.अडवणूक होत असेल. कर्मचाऱ्यांना जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल तर कोणाकडून काय अपेक्षा ठेवायची. खूप अवघड झालं आहे. जे शासन दरबारी व्यवस्थित रीतसर असेल ते काम करून घ्यावं एवढीच इच्छा आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here