शेतकऱ्यांना वरदान- ड्रॅगन फ्रुट लागवड. ड्रॅगन फ्रुटला भारतासह विदेशात ही मागणी

शेतकऱ्यांचा कल आता आधुनिक शेतीकडे वाढतोय. कमी वेळेत आणि कमी कष्ट करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.विविध आजारांवर गुणकारी ठरत असलेल्या ‘ड्रॅगन फ्रुट’ची अलीकडच्या काळात मोठी चर्चा होऊ लागली. थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल,श्रीलंका आदी देशांत लोकप्रिय असलेल्या या फळाची आता भारतातही यशस्वी लागवड होऊ लागली आहे. ड्रॅगन फ्रुटची मागणी सध्या बाजारात वाढली आहे. कमी कष्टांत बक्कळ पैसा देणाऱ्या या फळाची शेती किती फायदेशीर आहे, हे शेती तज्ञ तुम्हाला सांगणार आहेत.
शेतकरी त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक प्रकारची फळे आणि भाज्या यांचेही उत्पन्न घेऊ लागलेत. यामध्ये त्यांना चांगला नफाही मिळतो. इतर फळांप्रमाणेच ड्रॅगन फ्रुटची लागवड भारतात खूप वेगाने लोकप्रिय होत आहे.
ड्रॅगन फ्रुटची किंमत 200 ते 250 रुपये प्रतिकिलोपर्यंत आहे. याची लागवड केल्यास चांगले उत्पन्न मिळेल. यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता. ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, त्या ठिकाणी सुद्धा हे फळ चांगले वाढते. ड्रॅगन फ्रुटचा वापर जॅम, आईस्क्रीम, जेली उत्पादन, फळांचा रस, वाइन इत्यादींमध्ये केला जातो. फेस पॅक मध्ये ते वापरले जाते. त्यामुळे त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. ड्रॅगन फ्रुटची लागवड केल्यानंतर एका हंगामात किमान तीन वेळा फळ येते.एका फळाचे वजन साधारणपणे 400 ग्रॅम पर्यंत असते. एका झाडाला किमान 50-60 फळे येतात. या रोपाची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासूनच ड्रॅगन फ्रुटची फळे मिळण्यास सुरुवात होते. मे-जून महिन्यात याला फुले येतात, आणि डिसेंबर महिन्यात फळे येतात.
साधारणपणे दोन ड्रॅगन फ्रुट रोपांमधील अंतर दोन मीटर असावे. तुमच्याकडे सुमारे एक हेक्टर जमीन असेल, तर तेथेही तुम्ही सहज लागवड करू शकता. सुरुवातीच्या काळात तुम्ही या झाडांना लाकडी किंवा लोखंडी काठीचा आधार देत वाढण्यास मदत करू शकता. ही झाडं 50 सेमी x 50 सेमी x 50 सेमी आकाराच्या खड्ड्यात लावा, जेणेकरून त्यांची चांगली वाढ होईल.
यामधून चांगले उत्पन्न मिळत असल्याने अनेकजण नोकरी सोडून ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. एक एकर शेतीतून दरवर्षी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, त्यासाठी सुरुवातीच्या काळात चार-पाच लाख रुपये खर्च करावे लागतील. या शेतीत पाण्याची फारशी गरज नसल्याने शेतकऱ्यांना पाण्यावर जास्त खर्च करावा लागत नाही, त्यामुळे त्यांना चांगला नफा मिळतो.
महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड ड्रॅगन फ्रुटला जास्त पाणी लागत नाही. त्याचबरोबर जमिनीचा दर्जा फारसा चांगला नसला तरी या फळाची चांगली वाढ होऊ शकते. ड्रॅगन फ्रुटची लागवड एका वर्षात 50 सेमी पाऊस आणि 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानात सहज करता येते. याच्या लागवडीसाठी जास्त सूर्यप्रकाश लागत नाही.
त्यामुळे शेडचा वापर करणे आवश्यक आहे, जेणेकरून फळांची चांगली लागवड करता येईल. जर तुम्ही तुमच्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याचा विचार करत असाल तर वालुकामय चिकन मातीसोबत अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमीन या पिकास अधिक पूरक आहे. जमिनीचा सामू हा साडेपाच ते साडेसात असला पाहिजे. याची लागवड तुम्ही कोणत्याही क्षेत्रात करू शकता, परंतु सर्वाधिक लागवड महाराष्ट्रात, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात केली जाते.
त्याच वेळी, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी या फळांची लागवड करतात. आरोग्यासाठी फायदेशीर फळे आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. त्याचप्रमाणे ड्रॅगन फ्रुट “खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहे.
कोलेस्ट्रॉल मध्ये याचा फायदा होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये फॅट आणि प्रोटिनचे प्रमाणही खूप जास्त असते, आणि त्यामुळे सांधेदुखीचा आजारही दूर होतो. ड्रॅगन फ्रुट तुमच्या हृदयाशी संबंधित आजारही दूर करू शकते. पारंपरिक पद्धतीने शेती केल्याने शेतकऱ्यांना अनेकदा पाहिजे असे उत्पादन मिळत नाही. एवढेच नाही तर काहीवेळा लागवडीसाठी केलेला खर्च सुद्धा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि आर्थिक अडचणी सुद्धा त्यांना खूप येतात. अशावेळी ड्रॅगन फ्रुटची शेती शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here