इंदापूर: आज दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन यानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या वतीने इंदापूर येथे श्री गणेश पतसंस्था चे चेअरमन किशोर आबा पवार यांना सहकार रत्न पुरस्कार प्रधान करण्यात आला.महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील राज्यमंत्री दत्तामामा भरणे व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सत्कार करून पुरस्कार देण्यात आला.
कोरोना परिस्थिती होती तेव्हा श्री गणेश पतसंस्थेने सामाजिक उपक्रम राबवून सहकार्य केले आहे तसेच हे करत असताना संस्थेच्या हिताची अनेक कामे करून संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचे काम किशोर आबा याांनी केल्याने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी किशोर आबा म्हणाले की- “संस्थेच्या हिताच्याा दृष्टीने जे जेे शक्य असेल ते प्रामाणिकपणेे करण्याचा प्रयत्न करेन .आज मला पुरस्काकार दिल्याबद्दल मी सर्व आयोजकांचा मनापासून आभार मानतो .”असे यावेळी किशोर आबा म्हणाले