अखेर खुनाला फुटली वाचा- चुलत भावानेच केला चुलत भावाचा खून.

भिगवण: चार महिन्यांपूर्वी मौजे शेटफळगढे येथून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा खून त्याच्याच चुलत भावाने केला  असून त्याच्या मृत्यूचे गुढ उकलण्यात भिगवण पोलिसांना अखेर यश आले आहे.कोणताही धागादोरा  नसताना भिगवण पोलिसांनी आरोपीला पकडण्यात यश मिळविले.
याबाबत भिगवण  पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 21 ऑगस्ट 2021 पासून संभाजी शिवाजी जगताप यांचा मुलगा सुजित  संभाजी जगताप(वय 32वर्षे,रा.शेटफळगढे,ता.इंदापूर,जि. पुणे) बेपत्ता असल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात 23 ऑगस्ट 2021 नोंदविली होती.तेव्हापासून भिगवण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते पण कोणताच धागदोरा भिगवण पोलिसांच्या हाती लागत नव्हता.अतिशय बारकाईने तपास केला असता मयत सुजित जगताप हा गायब होण्यामागे चुलतभाऊ किशोर बाळासाहेब जगताप (वय 30 वर्षे,रा.शेटफळगढे, ता.इंदापूर,जि. पुणे)याचाच हात असल्याचा पोलिसांना संशय आला. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली पण पोलिसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्हा कबूल केला.
दिनांक 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी ठीक 11:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी किशोर जगताप याने त्याचा चुलतभाऊ सुजित जगताप याला फोन करून शेतात भेटण्यास बोलविले होते व त्याला भेटण्यास शेतात चाललो आहे असे घरी सांगून तो शेतात निघून गेला.संभाजी याचा चुलतभाऊ आरोपी किशोर हा अगोदरच शेतात होता.संभाजी जगताप येताच आरोपी  किशोर जगताप  याने त्याला खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली व यातच संभाजी जगताप याचा जागेवरच मृत्यु झाला.मयत संभाजी याचा मृतदेह गोणीत भरून जवळच्याच ऊसाच्या शेतात मध्यभागी खोल खड्डा  खोदून मृतदेह पुरून टाकला व पाठीमागे कोणताही पुरावा न ठेवता तो तेथून निघून गेला.  गुन्ह्याची कबुली मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी जागेवर जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला व आरोपी किशोर जगताप यास ताब्यात घेतले.खुनाचे कारण अद्याप समजले नसून तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप नि. विनायक दडस पाटील,रुपेश कदम,सुभाष रुपनवर, पोलीस अंमलदार नाना वीर,सचिन पवार,महेश माने,महेश उगले,अंकुश माने,हसीम मुलाणी,अक्षय कुंभार,गणेश पालसांडे,आप्पा भांडवलकर, पोलिसमित्र अतुल माने,अनिल धवडे, सुहास पालकर यांनी पार पाडली.


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here