इंदापूर प्रतिनिधी: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ कोरोनाचा संसर्ग वाढत असून त्याचबरोबर ओमिक्रॉनचे संकट निर्माण झाले असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. मास्कचा वापर केला पाहिजे तसेच सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सला प्राधान्य दिले पाहिजे. कोरोना पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या निर्देशाप्रमाणे नागरिकांनी नियमांचे पालन करावे तसेच ज्या नागरिकांचे अद्याप लसीकरण झाले नाही त्यांनी लसीकरण करावे असे आवाहन हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.