मोकाट आरोपीला पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट व बेजबाबदार पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबन करावे-प्रभाकर देशमुख

मंगळवेढा प्रतिनिधी: मरवडे तालुका मंगळवेढा येथील दोन चिमुकल्या मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूस कारणीभूत असलेले आरोपी तब्बल दहा दिवसाचा कालावधी ओलांडला तरीही ते मोकाट आहेत, याला पुर्णता जबाबदार मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हेच आहेत, गुंजवटे यांच्या काळात अनेक गुन्हे आर्थिक तडजोडीतून दडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आम्ही ऐकतोय,अशा भ्रष्ट व बेजबाबदार पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी व्हावी,त्यांना निलंबित करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आज मरवडे येथे केली.
मरवडे येथे आज सकाळी दहा वाजता हजारो नागरिक, महिलांच्या उपस्थितीत चव्हाण कुटुंबातील त्या दोन मयत मुलींना न्याय मिळावा, मोकाट आरोपींना तात्काळ अटक व्हावी, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,
या आंदोलनात मरवडे गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करून आपला संतापजनक आक्रोश महिला व पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला,याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते लतीफभाई तांबोळी, माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, प्रहारचे संतोष पवार,माणिक पवार, शेतकरी संघटनेचे नेते दत्तात्रय गणपाटील, यांच्यासह आदींनी या मुलींना न्याय मिळावा, वेळ मारू करणाऱ्या पोलिस प्रशासनाविरोधात आपली निराशजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, मंगळवेढा तालुक्यात अनेक गुन्हे वाढत आहेत, बेफिकीर, बेजबाबदार, कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकार्‍यामुळे मंगळवेढा पोलीस खाते बदनाम होत आहे, अनेक गुन्हे तडजोडीतून मिरवली जात आहेत,नागरिकात होणाऱ्या या चर्चेमुळे हे खाते बदनाम झाले आहे, कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक गुंजवटे यांच्या कामकाजावर नागरिक नाराज आहेत,याची वरिष्ठांनी दखल घ्यावी,
मरवडे येथे झालेल्या या घटनेला आज तब्बल दहा दिवसाचा कालावधी उलटला, तरीही तपासाच्या नावाखाली आरोपीला अभय देत आहेत, ते मोकाट आरोपी पोलिसांच्या आशीर्वादाने अटकपूर्व जामीन घेतील, आपला व्यवसाय पुन्हा तेजीत सुरू करतील, खऱ्या अर्थाने चव्हाण कुटुंबावर अन्याय होतोय,यावर कोण बोलणार,जनतेचे आमदार लक्षवेधी करून चव्हाण कुटुंबाला न्याय द्यायला हवा होता, त्यांना आर्थिक मदत मिळावी, लवकरात लवकर संबंधित आरोपीला अटक करून कर्तव्यात कसूर करणारे अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी व्हावी, त्यांचे निलंबन व्हावे,अशी मागणी देशमुख यांनी करताच मरवडेकरांनी दाद दिली,
या प्रसंगी मंगळवेढा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे, बोलताना म्हणाले,मरवडे गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत आता दिरंगाई होऊ नये, आम्ही सर्वजण चव्हाण कुटुंबासोबत आहोत, लवकरात लवकर आरोपींना अटक करून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली, तसेच युवराज घुले यांनीही चव्हाण कुटुंबाविषयी झालेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाला जाब विचारला, तपास कामात दिरंगाईमुळे उलट सुलट चर्चा होत आहेत,याची खबरदारी घेऊन पारदर्शक तपास व्हावा, अन्यथा सर्वसामान्य जनता होणारा अन्याय सहन करणार नसल्याचे घुले यांनी बोलताना व्यक्त केला.
पोलिसांनी येत्या चार दिवसात आरोपी गजाआड नाही केल्यास तालुका बंद ठेवून जनआंदोलन करू असा इशारा पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे, यावेळी उपस्थित जनसमुदाया समोर डी वाय एसपी पाटील यांनी आश्वासन देऊन तपास कामात मी स्वतः लक्ष देऊन चव्हाण कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वास दिले.
मरवडे येथील भक्ती व पूनम चव्हाण या दोन लहान बहिणीचा बासुंदी श्रीखंड पनीर आणि रबडी या दुग्धजन्य पदार्थांतून झालेल्या विषबाधेमुळे दहा दिवसापूर्वी मृत्यू झाला. तरीही आंदोलन करून न्याय मागण्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.
या प्रकरणात अन्नभेसळ खात्याने संतोष कौडूभैरी व आकाश फुगारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु अद्याप या आरोपीला अटक केली नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,
नामदेव गायकवाड,सुरेश पवार गुरुजी, सरपंच नितीन घुले, दादासाहेब पवार,अजित पवार,दत्तात्रय गणपाटील, धन्यकुमार पाटील,शिवाजी पवार,माणिक पवार, सुभाष भुसे,दत्ता मासाळ, राजाराम पोतदार,संभाजी रोंगे, अंबादास पवार,राजाराम कालीबाग,प्रकाश सूर्यवंशी,हैदर केंगार,रतीलाल केंगार,श्रीकांत गणपाटील, राहुल शिंदे,सतीश शिंदे,सिद्धेश्वर सूर्यवंशी, विजय पवार,शिवाजी केंगार,विकास दुधाळ,सुदर्शन रोंगे,दुशासन दुधाळ, सतीश शिंदे, संजय पवार,समाधान ऐवळे,गणेश पाटील, बालाजी पवार, दादासाहेब रोंगे, किसन रोंगे, रघुनाथ चव्‍हाण, राजाराम कोळी, अल्लाबक्ष इनामदार,युवराज सुर्यवंशी, अशोक जाधव, सचिन घुले, अतुल पवार, निलेश स्वामी, गणपत पवार, दत्ता शिवशरण,परशु केंगार,प्रकाश पारसे,आदी जन उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here