कर्जत (प्रतिनिधी): कर्जत-जमखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे कोव्हिड पॉझिटिव्ह आले असून याबाबत त्यांनी स्वतः सोशल मीडिया द्वारे माहिती दिली आहे.
कर्जत जमखेडचे आ. रोहित पवार यांनी दि 3 जाने रोजी सायंकाळी 10 वाजता सोशल मीडियावर पोस्ट करून यामध्ये म्हटले आहे की तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो,पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
आ. रोहित पवार यांनी काल दुपारी 12 वाजता कर्जत नगर पंचायत निवडणुकीतील चार जागांसाठी उमेदवारी भरण्यासाठी कार्यकर्त्यासह संत श्री गोदड महाराज मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेऊन आरती समाप्ती केली होती याशिवाय शाळांना टॅबच्या वाटप कार्यक्रमासही उपस्थिती होते त्यामुळे आज कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते व शिक्षक संपर्कात आले असण्याची शक्यता असून अशा सर्वानी काळजी घेऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे.