इंदापूर(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांनी कोरोना कालावधीत केलेल्या, सामाजिक कामाचा गौरव इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व पत्रकार संघाचे मुख्य सचिव सागर शिंदे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून,विशेष सन्मानपत्र देऊन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ.मुंबई राज्यस्तरीय अधिवेशन -२०२१ राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे मंगळवार ( ता. २८ डिसेंबर )रोजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, मुख्य सचिव सागर शिंदे यांना राज्यस्तरीय कोरोना योध्दा पुरस्कार व सन्मानपत्र प्रदान करण्यांत आला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, प्रदेश महासचिव विश्वासराव आरोटे,कोकण विभागाचे प्रमुख नितिन शिंदे, तसेच इंदापूर पत्रकार संघाचे, उपाध्यक्ष संदिप सुतार, पत्रकार संघ पदाधिकारी गोकुळ टांकसाळे, शिवकुमार गुणवरे,भीमराव आरडे, उदयसिंह देशमुख, मनोज साबळे, बाळासाहेब कवळे,विजयराव शिंदे व राज्यांतील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन इंदापूर तालुक्यात सारख्या विस्तीर्ण तालुक्यात कोरोना कालावधीत 40 गावांमध्ये गोरगरीब गरजू उपेक्षित कलावंतांना अन्नधान्य पुरवूण आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक जाणिवेतून काम करणारा इंदापूर तालुक्यातील पत्रकार संघ आहे.या पत्रकार संघाच्या कार्याला आमच्या शुभेच्छा असून आगामी काळात पाहिजे तिथे मदत करू.असे आश्वासन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे,व माजी सहकार मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.