पाटस: दौंड तालुकयातील पाटस येथील दोन ट्रकमधून यवत पोलिसांनी ३० लाखाचा गांजा जप्त केला आहे. यासोबतच गांजाची आंतरराज्य आणि राज्याअंतर्गत वाहतूक करणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यातून पुणे येथे विक्रीसाठी गांजा आणला जाणार असल्याची माहिती यवत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना मिळाली होती. या माहितीनूसार आज पहाटे दीड वाजता पाटस गावाजवळ त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा लावला. त्यानूसार दोन मालवाहतूक करणारे ट्रक पकडून त्यातून एकुण ६ पिशव्यातून १६७.२५ किलो गांजा पकडण्यात आला. हा गांजा आणि मालवाहतूक करणारे दोन्ही ट्रक पोलीसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ७ पुरुष आणि ५ महिला अशा १२ आरोपींनी अटक केली आहे. यातील तीन आरोपी आंध्रप्रदेशातील असून एक जण पुणे जिल्ह्यातील मंचर येथील आहे. उर्वरीत सर्व आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली व मुथळा तालुक्यातील आहेत. ही कामगिरी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलिस सब इन्स्पेक्टर पद्मराज गंपले, गणेश सोनावणे, विशाल गजरे, विकास कापरे, जे. एम.भोसले, भानुदास बंडगर, रवींद्र गोसावी, मेघराज जगताप, महेंद्र चांदणे, नुतन जाधव, प्रमोद गायकवाड, सुजित जगताप, दिपक यादव, तात्याराम करे, गणेश मुटेकर, आनंद आहेर, श्री. धावडे, सत्यवान जगताप, विजय आवाळे या पोलिस पथकासह पोलीस मित्र रामा पवार, निखील अवचट यांनी पार पाडली आहे..