वडिलांनी प्रेमानं आणलेला खाऊ खाल्ल्यानंतर सुरू झाला त्रास; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, विषबाधेचा संशय

सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. वडिलांनी आणलेला श्रीखंड खाल्ल्यानंतर दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्यातील मरवडे येथे दोन चिमुरड्या बहिणींचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून यात विषबाधेचा संशय व्यक्त होत आहे. चिमुकल्या बाळाने पप्पांना खाऊ मागितला आणि वडिलांनी गावातील दुकानातून श्रीखंड, बासुंदी, पनीर, रबडी असे पदार्थ आणले. मात्र हा खाऊ खाल्यानंतर या मुलींना त्रास सुरू झाला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
बुधवार, २२ डिसेंबर रोजी आबासो चव्हाण यांनी चिमुकलीच्या मागणीवरून मंगळवेढा येथून श्रीखंड आणला होता. श्रीखंड खाल्ल्यानंतर दोन्ही मुलींना त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल केले असता मोठी मुलगी भक्ती आबासो चव्हाण (वय वर्षे ६) हिचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. त्यानंतर छोटी मुलगी नम्रता आबासो चव्हाण (वय वर्षे ४) हिलाही त्रास होऊ लागला. उपचार सुरू असतानाच तिचाही गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या दोन सख्ख्या बहिणींच्या दुर्दैवी मृत्युमुळे मरवडे परिसर व मंगळवेढा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here