छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा- जिल्हाकार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे

टेंभुर्णी ,ता. 22 : कर्नाटकातील बेळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या दोषी समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभाग जिल्हा कार्याध्यक्षा प्रा. मिनाक्षी जगदाळे यांनी माळशिरस च्या प्रातांधिकार्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव कर्नाटक येथे अखंड भारताचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली अशा समाजकंटकांचा निषेध न करता कर्नाटकचे मुख्यमंत्री व्ही एस बोमय्या यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना ही एक छोटी गोष्ट आहे असे विधान करून सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावण्याचे काम केले आहे. या वक्तव्याचा जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्यावतीने कार्याध्यक्षा शिवमती मिनाक्षी जगदाळे यांनी निषेध व्यक्त केला.
सर्व सकल मराठा समाज बहुजन समाज तीव्र निषेध करत आहे . कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर ही छत्रपती शहाजीराजे यांनी वसवली आहे छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय स्वारी करून कर्नाटकात आपल्या राज्यात सामील करून सर्व संरक्षण दिलेले आहे त्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून असे चुकीचे व्यक्त वक्तव्य निंदनीय आहे त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मिनाक्षी जगदाळे यांनी केली.
यावेळी निषेध म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला सदस्यांनी काळ्या रंगाच्या साड्या घालून कार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे यांच्या हस्ते प्रांताधिकारी विजय देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी नायब तहसीलदार उदया देसाई, जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष मनोरमा दत्तात्रेय लावंड तालुका उपाध्यक्ष ,मनीषा गायकवाड ,अकलूज शहराध्यक्ष शुभांगी क्षीरसागर, कोषाध्यक्ष शारदा चव्हाण , संघटक आशा सावंत, संघटक सुवर्णा गोरवे ,संघटक वैष्णवी साळवे ,उज्वला अडाणे ,संध्या सावंत ,संगीता जगदाळे आदी उपस्थित होत्या.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here