श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड ही पाणी वाटप प्रकल्प यशस्वी करणारी महाराष्ट्रातील एकमेव व पहिली संस्था – व्हाईस चेअरमन दत्तात्रेय घोगरे

सुरवड: श्री भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा संस्था सुरवड ता.इंदापूर जि. पुणे या संस्थेची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि 12 डिसेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय सुरवड या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळून पार पडली. संस्थेचे व्हाईस चेअरमन दत्तात्रेय घोगरे सर यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले की, ” गेली 31 वर्ष ही संस्था सभासदांना शेतीसाठी पाणीपुरवठा करत आहे परंतु संस्थेने 2020 पासून पाणी बचत करण्यासाठी पाट पाणी पद्धत बंद करून बंद पाईपलाईनद्वारे पाणी शेतकऱ्यांना त्यांच्या विहीरीमध्ये प्रति एकर प्रमाणे पाणी देण्याचा पाणीवाटप प्रकल्प राबवला आहे .यामध्ये पाणी बचत मोठ्या प्रमाणात होऊ लागली त्याचबरोबर शेतकऱ्यांना रोजचे रोज पाणी मिळू लागले आणि शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीस मदत झाली संस्थेच्या एकूण १२०० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचा पाणी वाटप प्रकल्प यशस्वी करणारी ही एकमेव व पहिली संस्था आहे. पाणी बचत करून शेती कशी करावी असा आदर्श ठेवणारी महाराष्ट्रातील ही संस्था आदर्श मॉडेल ठरणार आहे.” असे घोगरे सर यांनी सांगितले.तसेच ते पुढे म्हणाले की, शासनाची कोणतीही मदत न घेता स्वंय अर्थसाहाय्याने या संस्था सुरू झालेले आहेत.परंतु आता या संस्थांना शासनाच्या मदतीची गरज आहे.यापुर्वी पाणीपुरवठा संस्थांना वीज पुरवठा हा एक रुपया 16 पैसे प्रति युनिट दराने होत होता परंतु तो जून 2021 पासून तीन रुपये 69 पैसे प्रति युनिट प्रमाणे करण्यात आला व इतर करातही वाढ करण्यात आली ही वाढ जवळजवळ 325% झाली .या वाढीव दराने पाणीपुरवठा संस्था वीजबिल भरूणे अशक्य आहे. पर्यायाने शेतकऱ्यांसाठी उभ्या केलेल्या या व्यवस्था बंद पडतील तरी वेळीच शासनाने यामध्ये लक्ष घालून वीज दरवाढ रद्द करावी तसेच या पाणीपुरवठा संस्थांना नैसर्गिक नदी स्रोतातून शाश्वत पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली .
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष रामदास दादा कोरटकर होते या सभेस चेअरमन केशव सुर्वे ,माजी पं स सुरेश मेहेर माजी पं. स सदस्य तानाजीराव नाईक,नीरा-भीमा संचालक दादासाहेब घोगरे ,साहेबराव घोगरे ,लक्ष्मण कोरटकर, ज्ञानदेव शेरकर, बाळासाहेब घोगरे, तात्यासाहेब खोपकर, शरद कोरटकर , रमेश कोरटकर, हेमंत कांबळे, राजेंद्र विरकर, शिवाजी नलवडे, शिवाजी घोगरे, सचीव सिध्देश्वर घोगरे व शेतकरी उपस्थित होते. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सूर्यकांत फरतडे सर यांनी केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here