लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या संघर्षमय व्यक्तिमत्त्वामुळे जीवन जगण्यास प्रेरणा मिळते- जि.प.सदस्या अंकिता पाटील.

लाखेवाडी:लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्या मा. अंकिताताई हर्षवर्धन पाटील यांनी आज लाखेवाडीत स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले. यावेळी अंकिताताई पाटील म्हणाल्या की, लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे व मा.हर्षवर्धनजी पाटील यांचे तीन पिढीचे कौटुंबिक ॠणाबंध आहेत आणि हा ॠणाबंध असाच कायमस्वरूपी राहिल.समाजातील सर्वसामान्य जनतेचा विकास व उद्धार यावर लोकनेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांनी आयुष्यभर कार्य केले.खर तर सामन्य लोकांची नाळ गोपीनाथजी यांच्यात जोडली गेली होती.संघर्षमय जीवन जगलेले लोकनेते स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या व्यक्तिमत्वामुळे सदैव प्रेरणा मिळते.तसेच भविष्यात मा.पकंजाताई मुंडे व प्रितमताई मुंडे आम्ही एकत्रित असेच काम करत राहू असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास मा.श्री. तानाजीराव नाईक, मा.श्री. आबासाहेब उगलमोगले, मा.श्री.विष्णू जाधव, मा.श्री.पंढरीनाथ थोरवे,मा.श्री. रामचंद्र नाईक ,मा.श्री.पांडुरंग नाईक,मा.श्री.रवींद्र पानसरे, मा.श्री. नागेश पानसरे, मा.श्री.आप्पासो ढोले , मा.श्री.शिवाजी घोगरे, मा.श्री.पांडूरंग माने , मा.श्री.काशिनाथ अनपट, मा. श्री. सदाशिव बागल, मा.श्री. शिवाजी खाडे, मा.श्री.तानाजी चव्हाण, मा.श्री. कांतीलाल निंबाळकर, मा.श्री.वामन निबाळकर, मा.श्री.महेश निंबाळकर, मा.श्री. पंढरीनाथ थोरवे, मा.श्री.प्रकाश ढोले , मा.श्री.बापूराव ढोले, मा.श्री. अशोक उगलमोगले, मा.श्री.योगेश सानप, मा.श्री.बंटी जाधव, स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे सर्व युवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here