बहुजन परिषदेचे कार्याध्यक्ष दत्तात्रय बाबर संघटनेतून कायमस्वरूपी निलंबित- बिभीषण लोखंडे अध्यक्ष बहुजन परिषद

इंदापूर: दिनांक 6 डिसेंबर 2021 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त संघटनेच्या कार्यकारी समितीची बैठक आयोजित केली होती, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ परिषद सदस्य भगवानराव पासगे हे होते.डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात झाली कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये बहुजन परिषदेचे कार्याध्यक्ष श्री दत्तात्रेय बाबर यांच्या कार्यपद्धतीबद्दल सर्वच कार्यकारी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. श्री दत्तात्रय बाबर हे संघटनेमध्ये पदाधिकाऱ्यांना धमकावणे संघटनेमध्ये समांतर काम करण्याचा प्रयत्न करणे संघटनेचे नेतृत्वाला आव्हान देणे बहुजन परिषद संपवून टाकील अशी धमकी देणे संघटनेच्या वाढीसाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करणे अशा आशयाची तक्रार कार्यकारी समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले .त्यामुळे दत्तात्रेय बाबर यांचे वर्तवणूक संघटनेच्या वाढीला पोषक नसून अधोगतीला कारणीभूत ठरत असल्याचे सर्व समिती सदस्यांनी अध्यक्ष यांच्या लक्षात आणून दिल्याने शेवटी समिती बैठकीमध्ये श्री दत्तात्रेय बाबर यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवण्यात येऊन त्यांना संघटनेतून कायमस्वरूपी निलंबित करण्याची शिफारस समिती सदस्य श्री बिजू मिसाळ मेंबर यांनी मांडली व दुसरे समिती सदस्य संजय राऊत यांनी त्यास अनुमोदन दिले त्यांना निलंबित करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या मासिक मिटिंगमध्ये श्री दत्तात्रय बाबर यांना त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सुधारणा करण्यास अध्यक्ष महोदयांनी सांगितलं होतं तसेच ते तिथून पुढे मासिक मिटींगला सतत गैरहजर राहिले असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई योग्य असल्याचं अध्यक्ष महोदय यांचे मत आहे.तरी येथून पुढे सर्वच समाजातील लोकांना सुचित करण्यात येते की येथून पुढे दत्तात्रेय बाबर यांच्याशी बहुजन परिषदेचा कार्याध्यक्ष या नात्याने कोणीही कसलाही संबंध किंवा कसलाही पत्रव्यवहार करू नये त्यास बहुजन परिषद जबाबदार राहणार नसल्याचं आणि बहुजन परिषद आणि दत्तात्रय बाबर यांचा कसलाही संबंध नाही असे बहुजन परिषदेचे अध्यक्ष बिभीषण लोखंडे यांनी जाहीर केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here