ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी सावता परिषद महाराष्ट्रात लढा उभा करणार – कल्याण आखाडे.

इंदापूर: ओबीसी समाजास मुख्य विकास प्रवाहात आणण्यासाठी ओबीसी आरक्षण मिळणे ही काळाची गरज असून समाजास आरक्षण मिळवून देण्यासाठी सावता परिषद संपूर्ण महाराष्ट्रात लढा उभा करणार असल्याचे सूतोवाच सावता परिषदेचे महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.
सावता परिषदेच्या इंदापूर तालुका कार्यकारणीची विशेष बैठक इंदापूर शासकीय विश्रामगृहात परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ओबीसी समाजास न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी व महात्मा फुले ओबीसी महामंडळ आर्थिक बजेट मध्ये भरघोस वाढ करावी अशी आग्रही मागणी केली.
यावेळी सावता परिषदेचे मुख्य प्रदेश संघटक संतोष राजगुरू म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाप्रमाणे लोकसभा,राज्यसभा ,विधानसभा व विधानपरिषदेत समाजास २७ टक्के आरक्षण मिळणे गरजेचे आहे. यावेळी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे ,महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली गिरमे, जिल्हा उपाध्यक्षा अश्विनी भानवसे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल ननावरे, मार्ग दर्शक रामदास बनसुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,अंजना अभंग ,नगरसेवक पोपट शिंदे, संजय शिंदे यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात सूचना मांडल्या.
प्रास्ताविक परिषदेचे इंदापूर तालुकाध्यक्ष प्रकाश नेवसे यांनी केले.सुत्रसंचलन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमर बोराटे यांनी तर आभारप्रदर्शन सोशल मिडिया प्रमुख सचिन शिंदे यांनी केले. यांनी केले.यावेळी तालुका कार्याध्यक्ष मच्छीन्द्र भोंग, तालुका उपाध्यक्ष विष्णू झगडे, संघटक सुहास बोराटे, अजय गवळी, सौरभ शिंदे, शैलेश गवळी,शिवाजी मोहिते, महादेव गिरमे, तानाजी ननावरे, अमित खराडे, तेजस नेवसे उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here