पुणे – कात्रज परिसरातील भारती विद्यापीठ परिसरात एका तरुणाची भरदिवसा गोळीबार करून हत्या करण्यात आली त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. यात समीर उर्फ़ सम्या मणुर (40 , रा.आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याची गोल्डमॅन म्हणून ओळख होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा हा थरार घडला आहे. समीर हा चौकात उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. यात समीर गंभीर झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला.
माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तातडीने भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले. यानंतर गुन्हे शाखेची पथकेही दाखल झाली. पोलीस परिसरातील सीसीटीव्हीव्दारे आरोपींचा माग काढत आहेत.