आजपासून बारामती आगारातील एसटी बस सेवा पूर्ववत होईल- पुणे विभागाच्या वाहतूक नियंत्रक रमाकांत गायकवाड

बारामती: राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेली २८ दिवसांपासून सुरु असलेला संप मागे घेत पुणे जिल्ह्यातील बारामती आगारातून एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत.गेली महिनाभर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एका ठिकाणी उभी असलेली लालपरी अर्थात सर्वसामान्यांची जीवनदायिनी एसटी बस आज पुन्हा रस्त्यावर धावली. पुणे जिल्ह्यातल्या बारामतीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत एसटी बस सेवा पूर्ववत सुरू केली आहे.
बारामती आगारातून सध्या २५ एसटी बस वेगवेगळ्या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. आजपासून बारामती आगारातील एसटी बस सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास पुणे विभागाच्या वाहतूक नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांमध्ये एकवाक्यता नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते त्यामुळे जरी पुणे वाहतूक विभागाच्या नियंत्रक विभागाने एसटी सुरळीत चालू होईल असं सांगितलं असलं तरी येणाऱ्या दोन दिवसात बस सुरळीत चालल्यास सामान्य लोकांना खात्री पटेल असे चित्र निर्माण झाले आहे.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेली २८ दिवसांपासून सुरु असलेला संप मागे घेत पुणे जिल्ह्यातील बारामती आगारातून एसटी बस सुरु करण्यात आल्या आहेत. पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी बारामतीत येवून एसटी चालक, वाहकांची समजूत घालत एसटी बससेवा सुरू करण्यासंदर्भात विनंती केली. त्यानुसार बारामती आगारातून बारामती नीरा, जेजुरी, इंदापूर, भिगवण, इंदापूर या मार्गावरील बस सेवा बरोबर करण्यात आली आहे.यापूर्वी स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी चिंचवड, बारामती आणि दौंड सुरु करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. या पाच एसटी डेपोमधून दीडशेहून अधिक एसटी बस सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण चालणारी प्रक्रिया आहे. यातच संपकरी यांच्याबाबतीत सरकार कठोर निर्णय घेण्याच्या भूमिकेत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची समजूत घालून त्यांना सेवेवर होण्याची विनंती केली असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. त्यामुळे आज बस सुरळीत धावणार का व या माध्यमातून सामान्य लोकांची होणारी गैरसोय थांबणार का हे समजेल.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here