इंदापूर तालुक्यातील काटी-वडापुरी गटातून अमोलराजे इंगळे यांनाच पसंदी..! आज पर्यंत केलेली समाजसेवा व मेहनत येणार कामाला..

तालक्यातील जनतेच्या सुख दुःखात सहभाग,अनेक सामाजिक उपक्रम जनतेसाठी राबविणार्या अमोलराजेंची आसपासच्या चार-पाच त तालुक्यात ख्याती.

इंदापूर (प्रतिनिधी:संतोष तावरे): इंदापूर तालुक्यातील काटी वडापुरी गटातून अमोलराजे इंगळे यांना उमेदवाराची सुवर्णसंधी मिळणार असल्याची इंदापूर तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे. कोणी गोट्या,विटी दांडू,चिचूके खेळणाऱ्या टिनपाट भाऊ, काका, भैय्या,आण्णा, सोम्या आणि गोम्या यांना गावात काडीचीही किंमत नसणारे उपटसुंभे आज गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत,पण त्याला अपवाद म्हणून युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांचा इंदापूर दांडगा जनसंपर्क, कोरोना काळामध्ये अनेक गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू वाटप , मोफत भोजन, अधिकाऱ्यांना कोरोना काळात सहकार्य, स्वतःच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त अनावश्यक खर्च टाळून सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक उपक्रम राबवतात.
गावांमध्ये आधार कार्ड कॅम्प, जेष्ठ नागरिकांसाठी कॅम्प, एसटी स्मार्ट कार्ड साठी कॅम्प, ऊसतोड कामगारांसाठी दिवाळी भेट असे अनेक सामाजिक उपक्रम ते आपले हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत आणि अमोलराजे मित्र परिवारच्या मार्फत राबवत असतात. इंदापूर तालुक्यासह माढा, करमाळा, माळशिरस, बारामती, अमोलराजे इंगळे यांची ख्याति असल्यामुळे कोणता ना कोणता पक्ष त्यांना शंभर टक्के उमेदवाऱी दिल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा काटी, वडापुरी पंचायत समिती गणातून सर्वत्र पसरत आहे. गेल्या पंचवार्षिक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते निवडणुकीसाठी इच्छुक असताना त्यांना थांबवून त्यांच्या मोठ्या भगिनी ऋतुजाताई पाटील यांना उमेदवारी दिली होती आणि थोडाफार मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांच्या जागेवर अमोलराजे इंगळे यांची उमेदवारी दिली असती तर वेगळा निकाल पाहायला मिळाला असता अशी सध्या चर्चा आहे.
कुठलाही पर्याय निर्माण झाला तर अमोलराजे इंगळे हे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजयी उमेदवार म्हणुन किंगमेकर ठरणार आहे. अमोलराजे इंगळे एक कट्टर भाजपचे समर्थक असले तरी त्यांना तिकीट न दिल्यास इतर पक्ष, त्यांना तिकीट देण्यासाठी समर्थ असल्याची चर्चाही रंगू लागली आहे पण ते म्हणाले की, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि देईल तो उमेदवार त्याचे मी काम करेल पण मला तिकीट मिळावं, गेल्या वेळेस मला थांबायला सांगितलं होतं यावेळेस माझा पूर्ण विचार करावा अशी त्यांनी आपली भावना व्यक्त केली.सध्या गेले पाच ते दहा वर्षापासून हर्षवर्धन पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असणारे अमोलराजे इंगळे यांना उमेदवारी मिळणे गरजेचे आहे.कारण कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत संचालक पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात भाग पाडले होते.
पुन्हा पुन्हा पक्षांनी त्याच तोंडाला त्याच माणसाला संधी देऊ नये, कारण एक वेळी निवडून गेलेला उमेदवार नंतर चालत नाही नव्या माणसांना संधी द्या पक्षाची तरक्की झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्यातच काय ? दुसरे पण एकदा पारखून बघा..! सामान्यातल्या सामान्य माणसाला सामान्य जनतेला न्याय दिला पाहिजे, तो माझ्या घरचा आहे, तो माझा पाहूणा आहे,तो माझ्या जवळचे मेहुणे पाहुणे बाजूला ठेवून राजकारण करावं लागतं. राजकारण करायचं असेल तर सामान्य जनतेच्या जीवावर करावे. सामान्य कार्यकर्ता आपला म्हंणा , सामान्य जनतेला जो छळतो तो धुळीला मिळाल्याशिवाय राहत नाही आशी सामान्य जनतेत चर्चा आहे.  

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here