भिगवण: कालपासून चालू असलेल्या पावसामुळे सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असतील तर ते ऊस तोडणी कामगारांचे. रात्र-रात्र जागून लहान मुलं कुशीत घेऊन सकाळ व्हायची वाट पाहणे व सकाळी आपल्या घरात म्हणजे कोपीत मध्ये शिरलेले पाणी बाहेर काढणे, रात्रभर उपाशी असल्यामुळे सकाळ झाल्यानंतर लहान मुलांना भूक लागलेली असते अशा वेळी स्वयंपाक करण्यासाठी सरपण भिजलेले आहे मंग या अवस्थेत काय करावं ही मानसिकता ऊस तोडणी कामगारांची झालेली दिसून आलेली होती आणि हाच विषय लक्षात घेऊन भाजपाचे पुणे जिल्हा कामगार आघाडी सरचिटणीस तथा परिवर्तन फाउंडेशन अध्यक्ष रोहित बागडे यांनी सोशल मीडियाद्वारे सर्व कारखाने व शासनास काल झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणी कामगारांना तातडीने मदत करावी अशी मागणी केली आहे ऊसतोड कामगारांना तातडीने सरकारने व कारखान्याने मदत जाहीर करावी यात त्यांची जेवणाची सोय करावी.त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून द्यावा,आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी त्याच बरोबर रोहित बागडे यांनी सर्व समाज बांधवांना विनंती केली आहे की , आपल्या आजूबाजूला जे ऊस तोड मजूर आहेत त्यांना अवकाळी पावसामुळे खूप त्रास होत आहे .त्यांच्या बरोबर त्यांची लहान लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती सोबत असतात तरी आपण आपल्या गावातील असलेली समाज मंदिरे , शाळा , ग्रामपंचायत हॉल , किंवा कोणाचे छोटे मोठे शेड असतील तर पाऊस संपेपर्यंत निवारा म्हणून त्यांना देण्यात यावा व या माध्यमातून आपल्या ऊस तोडणी माय माऊलींना मायेचा उभारा द्यावा अशी त्यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले आहे.