भिगवण प्रतिनिधी: रोहित बागडे
भिगवण: भिगवण सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली.
पप्पू यास दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणी येत होत्या त्यामुळे त्यांनी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संपत तात्या बंडगर यांच्याकडे त्यांनी व्हीलचेअरची मागणी केली असता आज ती रोटरी क्लब च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली व्हीलचेअर दिल्यानंतर लाभार्थी पप्पू जाधव यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून रोटरी चे सदस्य समाधानी झाले.
यावेळी रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे ,उपाध्यक्ष औदुंबर हुलगे, माजी अध्यक्ष संपत बंडगर व स्वप्निल ढोले उपस्थित होते. यावेळी बोलताना भिगवण रोटरीचे क्लब अध्यक्ष संजय खाडे म्हणाले की या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो याच हेतुने आम्हाला जे काही शक्य आहे ते आम्ही सामाजिक बांधीलकीतुन करण्याचा आमचा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न राहील.
यावेळी व्हीलचेअर मिळाल्याबद्दल पप्पू जाधव यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.