कर्जत ( विशेष प्रतिनिधी: संतोष तावरे ): व्याजाच्या पैशांच्या बदल्यात सगळीकडेच अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या नावे लिहून घेत अनेक खाजगी सावकार मोठे झाले आहेत. अनेकांचे संसार धुळीस मिळाले ,काही ना तर मुलांचे शिक्षण देखील नाही करता आले, आपल्या मुलांची शाळेतली फी सुद्धा नाही भरता आली , अहो ,एवढेच काय पण आपल्या लहान मुलांनी कपडे जरी आपल्याला आणायला सांगितली तरी आपण त्याला कपडे नाही घेऊ शकत, पण आपण सावकारांचा खिसा भरतोय, आपण पैसे घेतोय म्हणजे आपण त्यांचा प्रपंच मोठा करतोय, असे सर्रास सगळीकडे चालू आहे असे समजते ,काही गावात तर आत्ता 10 ते 20 टक्के पर्यंत खासगी सावकार व्याज दर घेत आहे. एवढी लोकांची पिळवणूक होत आहे. असे खूप काही लोक सावकारकी च्या चक्रव्यूहात अडकले आहेत . सावकारकी चा व्याजदराचा रेट 10 ते 20 रुपये टक्के एवढा चालल्याचे दिसून येत आहे. दुप्पट-तिप्पट जरी आपण सावकारला पैसे दिले तरी त्यांचे पोट नाही भरत, आशा सावकारकी च्या चक्रा मध्ये खूप काही लोक अडकले आहेत.
पण अशीच एक कर्जत मध्ये घटना घडली, कर्जतच्या पोलीस निरीक्षक पदाचा पदभार चंद्रशेखर यादव यांनी स्वीकारला सावकारांना लगाम बसला सावकारांनी व्याजात घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळू लागल्या, यामुळे पोलिस निरीक्षक यादव आणि कर्जत पोलिसांवरील तालुक्यातील जनतेचा विश्वास खूप वाढला, कर्जत तालुक्यातील भोसे या गावातील शेतकरी नितीन नामदेव क्षीरसागर यांनी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे भोसे येथील एका सावकाराकडून सन 2016 रोजी 3 लाख रुपये 3 टक्के या व्याजदराने घेतले होते ,त्याबदल्यात सावकाराने त्यांच्याकडून एक एकर जमीन पैसे परत देण्याच्या बोलीवर लिहून घेतली होती, त्यानंतर क्षीरसागर यांनी मध्यंतरीच्या काळात दोन लाख 20 हजार रुपये सावकाराला दिले, मात्र सावकार आणखीन सहा लाख 50 हजार रुपयांची मागणी करत होता, मी तुम्हाला भरपूर पैसे दिलेत, तरी आणखीन चार लाख रुपये देतो माझी जमीन मला परत करा, अशी कळवळीणे विनंती क्षीरसागर यांनी सावकाराला केली, तीन लाखांचे सहा लाख वीस हजार देत असून देखील सावकारी जमीन परत करण्यास नकार देत होता शिरसागर हतबल झाले त्यांना काय करावं ते समजेना , एवढी मोठी रक्कम आपण त्यांना देतोय तरीही तो सावकार जमीन परत करत नाही त्यामुळे त्यांना नैराश्य आले, पण शेवटी ते घाबरले नाहीत डगमगले नाहीत ,त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना भेटून सर्व हकीकत सांगितली यादव यांनी पोलीस अमलदार सुनील माळशिखरे, मनोज लातूरकर, अमित बर्डे ,भाऊसाहेब यमगर ,यांना सदर सावकाराला तात्काळ बोलून घेण्याचे आदेश दिले ,यादव यांच्या भीतीने सावकाराची बदललेली नियत माघारी आली आणि मी लगेच जमीन परत करतो असे त्या सावकाराने सांगितले.दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सावकाराने संबंधित जमीन शेतकऱ्याला परत केली आहे, कायदा-सुव्यवस्था राखणे बरोबरच अनेकांचे मातीमोल झालेले संसार कर्जत पोलिसांमुळे पुन्हा एकदा नव्याने फुलले आहेत ,या पोलिसांच्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत हे मात्र नक्की, त्यामुळे सर्व लोकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे, एखांदा सावकार आपली अशीच पिळवणूक करत असेल, दुप्पट, तिप्पट ,चौपट पैसे घेत असेल ,धमक्या देत असेल ,तुमचे जगणेच मुश्कील करत असेल ,तर तुम्ही गप्प न राहता पोलिसांशी संपर्क साधणे गरजेचे आहे..