कष्टकरी गोरगरीब असो अथवा पंतप्रधान प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार संविधानाने दिला- प्रा.मिनाक्षी जगदाळे जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष

अकलूज: आपल्या देशात गल्ली पासून दिल्ली पर्यंत गावचा मेंबर ते आमदार, खासदार निवडण्यासाठी कष्टकरी गोरगरीब ,मजुरांना एकाच मताचा अधिकार व देशाच्या प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांना देखील एकाच मताचा अधिकार, समता, बंधुता ,न्याय असे विविध हक्क अधिकार व कर्तव्य ते भारतीय सविंधान आणि अथक परिश्रमातुन सविंधानाची निर्मिती करणाऱ्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार प्रज्ञा सूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब तथा भीमराव रामजी आंबेडकर यांच्यामुळेच असे मत जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष मीनाक्षी जगदाळे यांनी आज अकलूज येथे व्यक्त केले. जिजाऊ ब्रिगेड सोलापूर जिल्हा यांच्या वतीने अकलूज येथे भारतीय संविधान दिना निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून व संविधान वाचन करून जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.सौ. मिनाक्षी अमोल जगदाळे, माळशिरस तालुकाध्यक्ष सौ. मनोरमा दत्तात्रय लावंड, तालुका सचिव .सौ पूनम सुसलादे, शहर कार्याध्यक्ष सौ , शारदा चव्हाण, सौ,. वैष्णवी गणेश साळवे, उज्ज्वला अडाणे व जिजाऊ ब्रिगेड सदस्य उपस्थित होते,.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here