जुन्नर: पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील १४ नंबर येथे पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला गोळ्या घालून ठार करून दरोडा टाकण्यात आला आहे.
आनंद नागरी सहकारी पतसंस्थेत सशस्त्र दरोडा पडला असून पिस्तूल धारी मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी पतसंस्थेत प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्यावर गोळी झाडली व दोन ते अडीच लाख रुपयांची रक्कम घेऊन ते मोटर सायकल वरून पसार झाले. या घटनेत व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे. नारायणगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे.