इंदापूर .ता.प्रतिनिधी. सचिन शिंदे
इंदापूर . रविवारी दि.२१ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील माजी नगरसेवक इंद्रेश्वर पलंगे यांच्या कुटुंबातील विवाह सोहळा होता.शहरातील गुरुदत्त सांस्कृतिक भवन येथे होणाऱ्या या दिमाखदार लग्न सोहळ्याचे भरणे यांना खास निमंत्रण होते. कार्यकर्त्याच्या निमंत्रणास मान देऊन दत्तात्रय भरणे या सोहळ्यास दाखल झाले. जेव्हा भरणे विवाहस्थळी दाखल झाले तेव्हा समोरचं नवरदेवाची वरात सुरु होती.डी जे च्या तालावर अनेक युवा पोरं नाचण्यात मग्न होती. मात्र भरणे त्या ठिकाणी दाखल होताचं पोरांचे लक्ष गेले अनं सुरु झाली ती गाण्याच्या तालावर एकच धमाल.
कधी क्रिकेट तर कधी कबड्डी खेळत तर कधी – कधी जत्रेत पोरांना खेळणी खरेदी करुन देत आपल्या बालपणीच्या आठवणी ताज्या करणारे मंत्री दत्तात्रय भरणे रविवारी वेगळ्याच मुड मध्ये पहायला मिळाले.भरणे यांनी यावेळी कोणता खेळ खेळला नाही तर थेट नवरदेवाच्या वरातीत “मला आमदार झाल्यासारखं वाटतयं गाण्यावर” ठेका धरीत धमाल केलीय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात व्हायरल होतोय.
क्षणार्धात विरोधी पक्ष नेते पोपट शिंदे,नगरसेवक अमर गाडे,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर यांसह अनेकांनी राज्यमंत्री भरणे यांना थेट उचलून घेत ” जवा बघतेस तु माझ्याकडं,मला आमदार झाल्यासारखं वाटतयं” या गाण्यावर ठेका धरला.स्वतः दत्तात्रय भरणे यांनी या वरातीत हजेरी लावल्याने नवरदेवासह लहान मोठी सर्वच काही काळ आनंदाच्या क्षणात न्हाहुन गेली होती.त्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी नववधूवरांना शुभाशिर्वाद देत त्यांचा दौरा पुढील नियोजन स्थळी मार्गस्थ झाला.