इंदापूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध २६ विषयांना मंजुरी.

इंदापूर: इंदापूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारत येथील छत्रपती शिवाजीराजे सभागृहात पार पडली.यावेळी विविध २६ विषयांना मंजुरी देण्यात आली.
नविन नगरपरिषदेच्या इमारतीजवळ दिड कोटी रूपये खर्च करून शहरातील नागरिकांना तसेच तालुक्यातील युवक,युवती व शालेय विद्यार्थ्यांना योग शिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योगभवनाच्या कामांना मंजूरी देण्यात आली.इंदापूर नगरपरिषद हद्दीतील अनेक बांधकामे भोगवटा दाखला नसलेमुळे अनधिकृत ठरवलेली आहेत.सदर मालमत्ता धारकांना दरवर्षी शास्ती भरावी लागते.भोगवटा दाखला नसलेमुळे बँका कर्ज देत नाहीत. अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.तरी सदर शास्ती शासनस्तरावर माफ करून मिळावी व बांधकामे अधिकृत करणेसाठीचा ठराव मंजूर झाला. कोरोना काळात हजारो नागरिकांना जीवदान देणारे अकलूज येथील प्रसिध्द डॉक्टर एम.के इनामदार यांना मानपत्र देऊन सन्मानित करणे.१/१/२०१६ रोजी नगरपरिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या पात्र सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना आश्वाशित प्रगती योजना लागू करणे तसेच स्वच्छ सर्वक्षण अभियानांतर्गत पुढील कार्यकाळात हगणदारीमुक्त इंदापूर शहर व ५ स्टार मानांकन मिळविणेबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.महेश सरवदे,माधुरी पवार, शिवाजी मखरे,सारिका सोनवणे हे अनुकंपातत्वानुसार व वारसाहक्काने नगरपरिषदेमध्ये नोकरी मिळावी यासाठी नगरपरिषदेसमोर उपोषणाला बसलले आहेत.या अनुषंगाने सभागृहात चर्चा झाली.शासनस्तरावर पाठपुरावा करून आंदोलनकर्त्यांच्या मागणीसाठी सर्वांनी सकारात्मक प्रयत्न करणेचा निर्णय घेणेत आला.शहरात चिकन गुणिया व डेंगू सदृश्य साथीच्या आजारी रुग्णांचे प्रमाण वाढत आहेत.आरोग्य विभागाला शहरात स्वच्छता करणे,औषध फवारणी करणाच्या सुचना नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिल्या.इंदापूर नगरपरिषदेच्या नविन प्रशासकीय इमारतीस विरश्री मालोजीराजे भोसले भवन नांव देणे व छत्रपती शिवाजीराजे सभागृहात शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प किंवा थ्री डी अद्यावत तंत्रज्ञानातील फोटो बसविणेची सुचना नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी मांडली.सभा अधीक्षक गजानन पुंडे यांनी कामकाज पार पाडले.यावेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.यावेळी उपनराध्यक्ष धनंजय पाटील,भरत शहा,गटनेते कैलास कदम,विरोधी पक्षनेते पोपट शिंदे,राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते गजानन गवळी सह सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here