रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या इंदापूर तालुकापदी शिवराज पवार तर शहराध्यक्षपदी अशोक भाऊ देवकर यांची निवड.

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) गटाच्या कार्यकारणी मध्ये तालुकाध्यक्षपदी शिवराज पवार तर शहराध्यक्षपदी अशोक भाऊ देवकर यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे पत्र कुर्डूवाडी येथे काल शासकीय विश्रामगृहात देण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील व ग्रामीण भागातील युवकांचे संघटन करून प्रामाणिकपणे सतत अग्रेसर राहणारे शिवराज पवार व इंदापूर शहरामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे व न्याय हक्कासाठी लढणारे अशोक भाऊ देवकर यांची निवड झाल्याने युवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) याचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख गणेश दादा घुगे यांच्या सहीने हे पत्र देण्यात आल्याचे शिवराज पवार व अशोक देवकर यांनी जनता एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनल शी बोलताना ही माहिती दिली.
इंदापूर तालुक्यातील अनेक युवकांना एकत्र करून पक्षसंघटन वाढवणे व ‘गाव तिथे शाखा’ निर्माण करणे त्याचप्रमाणे वंचित व लहानात-लहान व्यक्तीच्या न्याय हक्कासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून संघटनेशी एकनिष्ठ राहून भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व इंदापूर नगरपालिका यामध्ये आपले बळ सिद्ध करू असे शिवराज पवार व अशोक देवकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here