इंदापूर, वार्ताहर :छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील आदर्श कल्याणकारी राजे होते.किल्ले बनवा स्पर्धेतून शिवछत्रपतींचा इतिहास शिवप्रेमी पर्यंत पोहोचला. छत्रपतींचे आजोबा मालोजी
राजे यांना इंदापूर येथील स्वाभिमानाच्या व माणुसकीच्या लढाईत वीरमरण आले.त्यामुळे त्यांच्या इतिहासाचा वारसा जोपासण्यासाठी इंदापूर येथे शिवसुष्ट्री होणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन शिवव्याख्याते गणेश धालपे यांनी केले.
इंदापूर येथील आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा दिवाळीत घेण्यात आली होती. स्पर्धेत इंदापूर,बारामती व माढा तालुक्यातील २५० युवक, युवतींनी भाग घेतला होता.स्पर्धेतील
विजेत्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके देवून गणेश धालपे यांच्या हस्ते सन्मानझाला तर छत्रपतींच्या इतिहासाचा निरंतर प्रसार करणारे बोरी ( ता. इंदापूर ) या गावचे भूमिपुत्र गणेश धालपे यांचा मानपत्र देवून प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान करण्यात आला.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथी गटात विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अंजुम शेख हिने प्रथम, श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विदिता जाधव हिने द्वितीय,काझड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पार्थ नरुटे याने तृतीय तर श्री नारायणदास रामदास इंग्लिश मिडीयम स्कूलच्या यशराज व्यवहारे व कार्तिकी सरडे, श्री नारायणदास रामदास प्राथमिक विद्यामंदिरच्या अदिती जगताप यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.इयत्तापाचवी ते सातवी गटात श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या मनीष नायकुडे याने प्रथम, राधिका माध्यमिक विद्यालयाच्या संस्कृती व्यवहारे हिने द्वितीय,बारामती विद्या प्रतिष्ठान च्या अर्णव कानगुडे याने तृतीय तर जंक्शन नंदकिशोर विद्यालयाचा शुभम ननवरे,राधिका विद्यालयाचा आयान बागवान, विद्या प्रतिष्ठान इंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सई कदम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.इयत्ता आठवी ते दहावी गटात विद्या प्रतिष्ठानइंदापूर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या अथर्व परदेशीयाने प्रथम,राधिका माध्यमिक विद्यालयाच्याऋतिक राऊत याने द्वितीय व प्रियंका दिवसे हिने तृतीय तर श्री नारायणदास रामदासहायस्कूल च्या भक्ती जाधव व सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या दर्शन जाधव यांनी उत्ते जनार्थ पारितोषिक पटकावले. इंदापूर विद्या प्रतिष्ठान पॉलीटेक्निक कॉलेजच्या निखिल मद्रे यास विशेष पारितोषिक देण्यात आले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.संदेश शहा,कार्याध्यक्ष प्राचार्य तुषार रंजनकार यांनी प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी प्राचार्य ज्योती जगताप, भास्कर गटकुळ, अरविंद गारटकर, मुख्याध्यापक हनुमंत बोंगाणे, प्राचार्य सुप्रिया आगरखेड, श्रीकृष्ण टेकाळे, भीमराव चंदनशिवे, डॉ. राधिका शहा, अनुराधा इनामदार, शकीला सय्यद उपस्थित होते.प्रास्ताविक सचिव जमीर शेख यांनी तर सुत्रसंचलन विजयकुमार फलफले यांनी केले. आभार दीपक जगताप यांनी मानले.