भिगवण: महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत दिनांक 15 नोव्हेंबर रोजी भिगवण येथे खोडवा ऊस व पाचट व्यवस्थापन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व मेळावा आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी भिगवण मंडल कृषी अधिकारी श्री बाळासाहेब कोकणे साहेब यांनी पाचट व्यवस्थापन व त्याचे फायदे,शेतकरी मासिक व रब्बी हंगाम पीक विमा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. भिगवण परिसरात उसाचे क्षेत्र जादा प्रमाणात असल्याने मंडल कृषी अधिकारी कोकणे साहेब यांनी पाचट व्यवस्थापन कसे करावे याविषयीची माहिती देऊन यापुढील काळात पाचट व्यवस्थापन अग्रक्रमाने करावे असे आवाहन केले.
आडसाली उसातून हेक्टरी जवळपास आठ ते बारा टन पाचट मिळते त्या पाचटा मध्ये 40 ते 50 किलो नत्र,20 ते 30 किलो स्फुरद व 75 ते 100 किलो पोटॅश पुढील पिकास उपलब्ध होतो. आज ऊस क्षेत्राचा विचार केला असता जवळपास 70 टक्के शेतकरी ऊस पाचट जाळून टाकतात पाचट जाळणे यामुळे मोठ्या प्रमाणात हवेत प्रदूषण होऊन उष्णतेने जमीन आणि त्याची उपयुक्त जिवाणू आणि गांडूळ यांवर परिणाम होतो. त्यामुळे आपण आपल्या हाताने जमिनीचे आरोग्य बिघडविण्यास मदत करत आहोत पाचट ठेवले मुळे शेतीला प्रचंड फायदे होतात. या वेळी कृषी पर्यवेक्षक सरडे यांनी शेतकरी मासिक वाचन व मासिका बद्दल मार्गदर्शन केले कृषी सेवक टीबी काळे यांनी गहू हरभरा बीज प्रक्रिया याबाबत माहिती दिली. ही सर्व माहिती दिल्यानंतर प्रशिक्षणास आलेले शेतकरी व अधिकाारी यांनी आपल्या शिवारा मध्येच पाचट न जळण्याची सामुहिक प्रतिज्ञा घेतली.
पाचट व्यवस्थापन कसे करावे?
शेतात पसरलेल्या पाचटावर प्रति हेक्टरी 80 किलो युरिया,100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकावे त्यानंतर 10 किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन खत समप्रमाणात पसरून टाकावे व उसाला पाणी द्यावे 80 ते 90 दिवसात 65 पाचट कुजून जाते. यावेळी भिगवण मंडळाचे सर्व कृषी सहाय्यक, सरपंच तानाजी वायसे,कर्मवीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, संजय दहाडे, रोहन जाधव, अशोक शिंदे ,पोपटराव जगताप ,जावेद शेख, अमर जाधव, प्रसाद जाधव ,नारायण बंडगर, विठ्ठल थोरात, पांडुरंग जगताप ,अमोल वाघ ,उमेश वाघ, योगेश जाधव, तानाजी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.