जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
दौंड : भाजपच्या युवा मोर्चा सदस्या तथा प्रवक्त्या रुची पाठक यांनी भारत देश हा ९९ वर्षासाठी भाडे तत्वावर आहे पूर्ण स्वातंत्र्य नाही असे विधान गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते आणि आता कंगना राणावत यांनी भारताला १९४७ साली स्वातंत्र्य नाही तर भिक मिळाली आहे खरे स्वातंत्र्य २०१४ साली मिळाले आहे असे विधान केले आहे.देश स्वांतत्र्य झाला त्याला कारण होते बलिदान देणारे सर्व ज्ञात अज्ञात हुतात्मे आणि सर्व भारतीय जनता. ज्यांनी कसलाही विचार न करता केवळ भारताला स्वांतत्र्य मिळावं आणि आपल्या येणारी पिढी ही पारतंत्र्यातून मुक्त व्हावी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.
आज देशाच्या हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या आणि जे स्वांतत्र्य भारताला मिळालं तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतो त्याचा हा अवमान आणि अपमान आहे.
देशाच्या विरोधात गरळ ओकणाऱ्याला देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. आज या विधानांमुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेतच आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हुतात्म्यांचा हा अपमान आहे.
भाजपला जर खरच एवढं देशप्रेम आणि स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांविषयी प्रेम आदर आहे तर मग भाजप सरकार कंगना राणावत विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का..?? आणि अशा विचारधारा असणाऱ्या आणि देशाविरोधी, हुतात्म्यांच्या विरोधी वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीकडून पद्मश्री पुरस्कार माघारी घेणार का..?? असा सवाल युवा सेना तालुका प्रमुख दौंड विधानसभा समीर भोईटे यांनी केला.