अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सुप्रियाताई सुळे व राजवर्धन दादा पाटील ..

इंदापूर: इंदापूर-बारामती रोडवर अंथुणें नजीक चालू गाडीचा बिघाड झाल्याने स्विफ्ट गाडीचा अपघात होऊन 4 प्रवासी जखमी झालेले असतानाच योगायोगाने त्याच रस्त्याने इंदापूर तालुक्यातील युवानेते नीरा-भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे जात असताना हा अपघात पाहताच दोघेही मदतीला धावल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अपघाताची दुर्घटना पाहताच राजवर्धन पाटील यांनी त्वरित रुग्णांना उपचाराकरिता नेहण्यासाठी गाडीची व्यवस्था केली त्याच सुप्रियाताई यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून यांच्यावर ताबडतोब उपचार करण्याच्या सूचना दिल्या.ऐन वेळी परस्पर विरोधक असलेले राजकीय नेते अपघाताच्या कारणाने एकत्र येऊन दोघांनीही अपघातग्रस्तांची मदत केल्याने जमलेल्या गर्दीमध्ये समाधान व्यक्त केले जात होते.


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here