अनोखा उपक्रम: दिवाळी सणानिमित्त शिक्षकांच्या वतीने मुले व पालकांना फराळ व कपडे वाटप..!

एक हात मदतीचा या सामाजिक व आपलेपणाचे भावनेतून मूळ इंदापूर तालुक्यातील रहिवासी असणारे व सध्या भोर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील कुंड व राजेवाडी गावात प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असणारे योगेश पांढरे , राजू भोंग व धनंजय टेंबरे यांनी शिरगाव केंद्राचे केंद्र प्रमुख कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली शाळेतील मुलांना व पालकांना दिवाळीपूर्वीच दिवाळी फराळ व कपडे वाटप केले.
अतिशय दुर्गम भागात खडतर प्रसंगाना तोंड देत या भागातील लोक साधेपणाने सण साजरे करतात.

यावेळी शाळेतील शिक्षकांनी एक हात मदतीचा दिल्याने मुले व पालकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमाचे पालकांना विशेष कौतुक केले व आभार मानले. यावेळी शिक्षकांनी मुले व पालकांना लाडू ,चिवडा ,करंजी , चकली असा फराळ व नवीन कपड्याचे वाटप करण्यात आले.प्रसंगी राजीवाडी शाळेचे योगेश पांढरे , राजू भोंग व कुंड शाळेचे धनंजय टेंबरे , नवनाथ शेंडे , मुले , पालक उपस्थित होते.


 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here