इंदापूर ता.प्रतिनिधी. सचिन शिंदे.
इंदापूर तालुक्यांमध्ये शहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका मदतनीस काम करत आहेत. अशा अंगणवाडी सेविका व मदतनीस काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अशा अंगणवाडी सेविकांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी किंवा या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून तालुकास्तरावर मजबूत असे संघटन आवश्यक होते. त्यानुसार वालचंद नगर येथील निमसाखर बीटच्या अंगणवाडीसेविका पूनम घनश्याम निंबाळकर यांची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. अंगणवाडी सेविका संघटनेच्या नूतन अध्यक्ष पुनम निंबाळकर यांचा सत्कार क्रांतीसुर्य संघटनेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पूनम निंबाळकर म्हणाल्या की , संघटनेच्या वतीने इंदापूर तालुका यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांचे केंद्र, राज्य व जिल्हा तसेच प्रकल्प कार्यालयातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले