निमगाव केतकी: विद्यार्थ्यांना तणावमुक्त आनंददायी वातावरण निर्मितीत शिक्षण देण्यासाठी , आनंदायी समाज निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद पुणे यांनी दहा कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचित केले. मधील पहिले कलम माईंड फुलनेस म्हणजे सजगता, वर्तमान स्थितीचा विचार करणे, प्रत्येक ठिकाणी जागृत राहणे, दैनंदिन जीवनातील प्रत्येक काम सजगतेने करणे याबाबत विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी स्वानंदी शिक्षण हा अभ्यासक्रम भोर च्या गटशिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे व तंत्रस्नेही शिक्षक भोर यांनी तयार केलेला असून त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक ते आठ च्या वर्गांमध्ये करायची आहे.त्याचे व्याहाळी केंद्राचे एकदिवसीय प्रशिक्षण आज भैरवनाथ विद्यालय व्याहाळी येथे पार पडले.हे प्रशिक्षण देण्यासाठी केंद्रप्रमुख संभाजी आजबे यांच्यासह सुलभक बापूराव जाधव,दिलीप कांबळे व राजकुमार भोंग सर यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले.
अभ्यासक्रमाचे चार खंड पडतात १. माईंड फुलनेस सजगता,२.कथा,३.गतीविधी/कृती,४.अभिव्यक्ती
या प्रत्येक खंडासाठी 35 मिनिटाची तासिका प्रत्येक शाळेने परीपाठानंतर घेणे आवश्यक आहे त्यामध्ये चेक इन, कृती वर चर्चा आणि शेवटी चेक आउट असे स्वरूप असेल.
या स्वानंदी शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये पहिली ते आठवी या वर्गासाठी प्रत्येक खंडासाठी काही कृती अंतर्भूत केलेले आहेत, त्यांचा सराव प्रत्येक आठवड्यामध्ये विद्यार्थ्याकडून घ्यायचा आहे आहे.प्रशिक्षण कोरोनाचे नियम पाळून हसत खेळत पार पडले.आभार अजिनाथ आदलिंग यांनी मानले.