शरयू फाऊंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना साड्या व ब्लॅंकेट वाटप..

बारामती – संदिप आढाव

बारामती: शरयू फाऊंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील प्रभाग क्रमांक १३ मध्ये बारामती नगरपरिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती सत्यव्रत काळे यांच्या वतीने 100 गरजू महिलांसाठी साडी वाटप तसेच 100 ज्येष्ठ_नागरिकांसाठी ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे तसेच गटनेते सचिन सातव यांच्या हस्ते सदरचे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, माजी उपनगराध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक नवनाथ_बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष सिध्दनाथ भोकरे, मुस्लिम बँकेचे संचालक अल्ताफ_सय्यद, माजी नगरसेवक अनिल_कदम, पांडुरंग_चौधर, निलेश मोरे, नागेश कासार, दाऊद शेख, बाबू उबाळे, दिपक शिंदे आदी उपस्थित होते.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here