दौंड प्रतिनिधी अजय तोडकर: मो.7776027968
यवत : जगात सर्वत्र गाजलेल्या सुप्रसिद्ध असे विठ्ठल कामत हॉटेल, विठ्ठल कामत हॉटेल यांच्या सर्व भारतात शाखा आहे. त्यातील दौंड तालुक्या मधील पुणे-सोलापूर महामार्गावर यवत येथे शाखा आहे. याठिकाणी नाष्टा व जेवण खूप छान मिळते, येथे स्वच्छता व टापटीपपणा असतो व सेवा ही उत्कृष्ट मिळते. लोक नाश्ता व जेवण करण्यासाठी आवर्जून येतात.
पुणे मधील सुप्रसिद्ध बिल्डर मस्के सर हे आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे येता-जाता नेहमी हॉटेलमध्ये नाष्टा व जेवण करण्यासाठी थांबत असत, काल दिनांक 28 रोजी नाश्ता करण्यासाठी ते थांबले व गाडी मधून उतरल्यानंतर पार्किंग मध्ये खिशातून हातरुमाल काढत असताना खिशातील 50 हजार रुपये खाली पडले. त्यांना काही समजले नाही त्यांनी नाश्ता वगैरे करून ते तिथून निघून गेले. हॉटेल चे मालक संदीप शेळके हे काही कारणास्तव पार्किंग मध्ये गेलेले असता त्यांना 50 हजार रुपयांची रक्कम त्या ठिकाणी आढळून आली त्यांनी ती स्वतः जवळ ठेवली व तेथील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पाहिले रक्कम कोणाचे आहे. पण त्यामध्ये काही आढळून आले नाही. त्यांनी ती रक्कम स्वतःजवळ ठेवली व कोणी ती मागण्यासाठी येता आहे का त्याची वाट पाहिली, परंतु संध्याकाळपर्यंत कोणीही रक्कम मागण्यासाठी आले नाही. हॉटेल बंद करते वेळी 11 वाजता श्री. मस्के व त्यांचे मित्र त्या ठिकाणी आले. व सदर प्रकार श्री संदीप शेळके यांना सांगितला व हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे पाहण्याची विनंती केली. सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये पाहिल्यानंतर त्यांना काही आढळून आले नाही पण सीसीटीव्ही कॅमेरा चेक करत असताना हॉटेलचे मालक संदीप शेळके यांनी त्या व्यक्तींकडून सर्व माहिती घेतली की रक्कम किती होती कितीच्या नोटा होत्या हे सर्व माहिती त्यांनी काढून घेतली व सर्व शहानिशा करून सदर पन्नास हजार रुपयाची रक्कम श्री मस्के यांना सुपूर्त केली. त्यावेळी श्री मस्के यांनी हॉटेलचे मालक संदीप शेळके यांचे तसेच सर्व स्टाफ चे आभार व्यक्त केले.