शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस ने घेतली कारखाना निवडणुकीतून माघार -प्रदीप गारटकर

संतोष तावरे: इंदापूर प्रतिनिधी
इंदापूर: नुकतेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेसनोट जाहीर केले असून जिल्हाप्रमुख प्रदीप गारटकर यांनी ही केलेल्या नोट मध्ये असे म्हणले आहे की कर्मयोगी शंकरराव बाजीराब पाटील सहकारी साखर कारखाना लि. बिजवडी, ता.इंदापूर, जि.पुणे हा कारखाना आदरणीय कै. शंकरराब पाटील उर्फ भाऊ व कै.लीलाबती पाटील यांच्या ताब्यात असताना काटकसरीने चालवून कर्जमुक्त केला होता. सभासदांचे आणि ऊस उत्पादकांचे हित जोपासले जात होते.

परंतु सदर साखर कारखाना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यापासून कारखान्यात सहकार हे फक्त नावालाच राहिलेले असून हा कारखाना खासगी कारखान्यांप्रमाणे चालवला जात आहे. सभासद ब ऊस उत्पादक यांचेवर अन्याय करून ऊस दर इतर कारखान्यांच्या तुलनेत ४०० ते ५०० रुपये टनाला कमी दिला जात आहे. या कारखान्याच्या नावावर नवीन मशिनरी खरेदी करून त्या मशनरी स्वत:च्या खाजगी कारखान्यात बसविणे तसेच ऊस वाहनांचा करार कर्मयोगी ला करणे व प्रत्यक्ष या वाहनाने ऊस वाहतूक स्वत:च्या खासगी कारखान्यात करून या वाहनांचे वाहतूक पेमेंट कर्मयोगी मधून करणे अशा गैरकारभारांमुळे या कारखान्यावर खूप मोठा कर्जाचा बोजा स्वतःचे खासगी कारखाने चालविण्यासाठी केलेला आहे.ऊस उत्पादकांचे पेमेंट जानेवारी पासून आज अखेर ९ महिने कारखान्यानी केलेले नाही. कामगारांचे दहा महिन्याचे पगार थकीत आहेत. त्यामुळे कामगारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

विरोधी गटातील ऊस उत्पादकांना जाणून बुजून सभासद केलेले नाही. त्यांच्या अनामत रकमा भरुन घेतल्या आहेत परंतु त्यांना सभासद केलेले नाही.तसेच विरोधी गटातील सभासदांचे ऊस जाणून बुजून पाच वर्षे नेलेले नाहीत आणि ऊस पुरवठा केलेला नाही म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे.तसेच वारसाहक्काने विरोधी सभासदांच्या बारसांना सभासद करून घेतलेले नाही.

कारखान्यातील मोठ्या गैरकारभारामुळे कारखाना निवडणूक लढवून जिंकून जरी आणला तरी कारखान्याचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल अशी स्थिती दिसत नाही. सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असणारी खुप मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. परंतू अशा योग्य व चांगल्या लोकांना जाणीवपूर्वक सदस्यत्व रद्द करून उमेदवारीपासून कायदेशिररित्या दूर ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे अनुभव नसलेल्या उमेदवारांचा पॅनल उभा करून फक्त राजकारणासाठी राजकारण करणे आम्हाला योग्य वाटत नाही. साखर कारखाना हा राजकाराणाचे माध्यम नसून गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रपंच चालविण्याचे साधन आहे. तसेच कारखान्याची परिस्थिती ज्यांनी बिकट केली आहे त्यांनीच या कारखान्याची अधिक परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते. म्हणून याचा विचार करून सदर निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वत:चे पॅनल उभे करणार नाही असा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. असे प्रेस नोट मध्ये म्हटले आहे



बहुचर्चित इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण प्रकरण सविस्तर पहा.👇👇🦌🦌https://youtu.be/bXXoCMMUxq0



Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here